मुख्यमंत्र्यांची मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून चर्चा, पाणी पिण्याची तयारी दर्शविल्याची माहिती
पुणे : आरक्षणावरून मराठा समाज (Maratha reservation)आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज महत्वाची बैठक होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनोज जरांगे यांच्याशी (manoj jarange patil) फोनवरून चर्चा केल्याची माहितीसमोर आली आहे. मराठ्यांना अर्धवट आरक्षण नको असे जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यांनी आजपासून पाणी पिण्याची तयारी दर्शवली असल्याचेही समजते.
मुख्यमंत्र्यांशी सोबत झालेल्या चर्चेनंतर मनोज जारांगे आता अभ्यासकांशी चर्चा करणार आहेत.त्यानंतर जरांगे पाटील माध्यमांशी संवाद साधत भूमिका जाहीर करणार आहेत. आतापर्यंत जरांगे पाटील प्रत्येक नेत्याचा फोन लाऊड स्पिकरवर लावून सर्वांना ऐकवत. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत झालेले बोलणे त्यांनी जाहीर केलेले नाही.
राज्यभर मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे..त्यावर तोडगा काढण्याची राज्य सरकारमधून रात्रभर हालचाली सुरू होत्या. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या बैठकीत आरक्षणासंदर्भात विधी मंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय झाला यावर तिन्ही.पक्षांचे एकमत झाले असल्याचे देखील समोर येत आहे.
या संदर्भात आज ( मंगळवारी) महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत कुणबी प्रमाणपत्राबाबत शिंदे समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीत मराठा आरक्षणबाबात अध्यादेश निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अध्यादेशाला कोणतीही अडचण येणार नाही. विरोधकांचा देखील पाठींबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.