नगर जिल्ह्याच्या नामांतरसंदर्भात महत्त्वाची अपडेट, रेल्वेकडून 'अहिल्यानगर' नामांतरास मिळाला ग्रीन सिग्नल

'अहमदनगर' जिल्ह्याच्या नामांतरसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 'अहमदनगर' जिल्ह्याच्या 'अहिल्यानगर' अशा नामांतराला हरकत नसल्‍याचे पत्र जारी केले आहे. नामांतराची संपूर्ण प्रक्रिया ही केंद्राच्या अखत्यारीत येते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 3 Sep 2024
  • 05:50 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

Ahmednagar, Ministry of Railways, Ahilyanagar, Renaming District

'अहमदनगर' जिल्ह्याच्या नामांतरसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने  'अहमदनगर' जिल्ह्याच्या 'अहिल्यानगर' अशा नामांतराला हरकत नसल्‍याचे पत्र जारी केले आहे. नामांतराची संपूर्ण प्रक्रिया ही केंद्राच्या अखत्यारीत येते. त्यासाठी केंद्राच्या प्रत्येक विभागाची ना हरकत आवश्यक असते.  या नावाचे कोणतेही रेल्वे स्टेशन देशात इतरत्र नसल्याचे देखील रेल्वेने आपल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर झाला आहे. या संदर्भात महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी माहिती दिली. 

राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी 'अहमदनगर' जिल्ह्याचं नाव 'अहिल्यानगर' करण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये नामांतराची घोषणा केली होती. यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर' करण्याचा ठराव महापालिकेत मांडण्यात आला होता. अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. आता रेल्वे मंत्रालयाने या नामांतरास हिरवा कंदील दाखवल्याने नगर जिल्‍ह्याला 'अहिल्‍यानगर' नाव देण्‍यातील पहिला टप्‍पा पूर्ण होत असल्‍याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं नाव द्यावं अशी मागणी शासन दरबारी लावून धरली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर होणारचं असं ठामपणे सांगितलं होतं.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest