संग्रहित छायाचित्र
भगवा दहशतवाद हा शब्द मी वापरला होता, माझे तेंव्हाचे विधान चुकीचेच होते. मात्र त्यावेळी भगवा दहशतवाद होत असल्याचे पक्षाने सांगितले होते म्हणून मी तेव्हा तो दहशतवाद हा शब्द वापरला. पण हा शब्द का वापरला हे माहीत नाही. मात्र मी असे बोलायला नको होते. तो शब्द चुकीचाच असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी भगवा दहशतवाद संबोधनाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए-२) सरकारच्या काळात 'देशभरात भगवा दहशतवाद वाढला असल्याचे विधान केले होते. त्यावरून गदारोळ उठला होता. त्याचा फटका काँग्रेसला देशभरात बसला होता. पण आता शिंदे यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एका युट्युबवरील पॉडकास्टमध्ये बोलताना ते म्हणाले की, मी तेव्हा तो शब्द वापरायला नको होता. दहशतवादाला लाल किंवा भगवा असा कोणताही रंग नसतो. नरेंद्र मोदी तीन वेळा पंतप्रधान होतील, असे तुम्हाला वाटले होते का ? या प्रश्नावर शिंदे म्हणाले, मोदी कठोर परिश्रम घेतात. हिमाचलच्या निवडणुकीत मी त्यांना जमिनीवर काम करताना पाहिले आहे. आम्ही यूपीए-२ सरकारमध्ये होतो तेव्हा आम्हाला वाटले नव्हते की, मोदी ३ वेळेस पंतप्रधान होतील. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे, असेही शिंदे म्हणाले.