कल्याण हत्या प्रकरणी आरोपी विशालसह पत्नी साक्षी गवळीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

कल्याणमधील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम विशाल गवळीच्या पापाच्या कृत्यात बायको साक्षीचाही सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 2 Jan 2025
  • 12:28 pm

संग्रहित छायाचित्र

कल्याण पूर्वेत 23 डिसेंबरला अपहरण करुन एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली होती. या मुलीचा मृतदेह 24 डिसेंबरला कल्याणनजीक असणाऱ्या बापगाव परिसरात आढळून आला. पोलिसांनी तपास सुरु केला असता यात मुख्य आरोपी विशाल गवळी असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर आरोपी विशाल गवळी याच्या पत्नीची चौकशी केल्यानंतर तिने विशाल गवळीला यात मदत केल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला शेगाव, बुलढाणा येथून अटक केली व त्याची पत्नी साक्षी गवळी हिला देखील अटक करण्यात आली. 

 आज या प्रकरणी दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीच्या वकीलांनी कोर्टाकडे एमसीआरची मागणी केली होती मात्र न्यायालयाने आरोपी विशाल गवळी आणि पत्नी साक्षी गवळीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास काम अजून पूर्ण व्हायचे आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांना या प्रकरणात मृतदेह टाकण्यासाठी वापरलेली बॅग आणि मोबाईलचे सिम कार्ड जप्त करायचे आ. हे त्यासाठी आरोपींना 4 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेच्या पार्श्वभूमीवर विशाल गवळी याचा देखील एन्काऊंटर होऊ शकतो त्यामुळे मी न्यायालयकडे मागणी केली आहे की जोपर्यंत आरोपी हा पोलीस कस्टडीत राहील तोपर्यंत त्याच्या नातेवाईकांना त्याच्या संपर्कात राहू द्या असा अर्ज आरोपीचे वकील अॅड. संजय धनके यांनी न्यायालयाला दिला आहे. 

विशाल गवळी हा कल्याणमधील सराईत गुन्हेगार आहे. गेल्या वर्षी याच पीडित मुलीचा त्याने विनयभंग केला होता. त्याच्याविरुद्ध पोक्सोही दाखल होता. मात्र तो जामिनावर सुटला होता. 

Share this story

Latest