शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यांच्या पत्नी मेघना कीर्तिकर यांचे अल्पशः आजाराने निधन झालं आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदर कीर्तिकर यांच्या पत्नि गेल्य काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर वांद्य्रातील लिलावती रुग्णालयात उपाचर सुरु होते. मात्र, आज सकाळी म्हणजे रविवारी 5 जानेवारी रोजी पहाटे 3.30 च्या सुमारा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मेघना कीर्तिकर यांचे पार्थिव संध्याकाळी 6 च्या दरम्यान अंत्यदर्शनासाठी त्यांच्या गोरेगाव पूर्वमधील स्नेहदीप, पहाडी रोड नं2 याठिकाणी ठेवण्यात येणार आहे. तसेच, शिवधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.