माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल, ट्विट करत फडणवीसांना दिले आव्हान

माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात त्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली. अनिल देशमुख हे १०० कोटी खंडणी वसूली प्रकरणात सध्या जामीनावर बाहेर आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 4 Sep 2024
  • 05:21 pm

संग्रहित छायाचित्र

माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात त्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली. अनिल देशमुख हे १०० कोटी खंडणी वसूली प्रकरणात सध्या जामीनावर बाहेर आहेत. आपल्या ट्विट मध्ये या संदर्भात भाष्य करताना, दाखल केलेला गुन्हा तथ्यहीन असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

अनिल देशमुख यांनी ट्विट करत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  देशमुख आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, 

"धन्यवाद... देवेंद्रजी फडणवीस. माझ्यावर #CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता - न डगमगता मी #BJP च्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे. महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे !"

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest