कौल ठाकरे सेनेला!

काँग्रेस ९ आणि राष्ट्रवादी २ अशा ११ वेळा काँग्रेस विचारसरणीशी संबंधित उमेदवारांनी येथे विजय  मिळवला आहे. १९९० नंतर शिवसेनेने ५ वेळा विजय मिळवला आहे. शेड्यूल कास्ट फेडरेशन, शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने प्रत्येकी एक वेळा विजय मिळवला आहे.

Maharastra News , electoins, Congress ideology, Shiv Sena, Schedule Cast Federation,  Shetkari Kamgar Party,  Bharatiya Janata Party, lok sabha elections.

संग्रहित छायाचित्र

काँग्रेस ९ आणि राष्ट्रवादी २ अशा ११ वेळा काँग्रेस विचारसरणीशी संबंधित उमेदवारांनी येथे विजय  मिळवला आहे. १९९० नंतर शिवसेनेने ५ वेळा विजय मिळवला आहे. शेड्यूल कास्ट फेडरेशन, शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने प्रत्येकी एक वेळा विजय मिळवला आहे. तूर्त  शिवसेनेची हवा असली तरी अलीकडे कोणत्याच पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या पाठीमागे  उभे राहण्याऐवजी प्रत्येक वेळी स्वतंत्र निर्णय घेण्याचा सुज्ञपणा मतदारांनी दाखवलेला आहे.   

ऐतिहासिक महत्त्व, धार्मिक-सांस्कृतिक, साहित्य संदर्भ, कृषी, पर्यटन आणि वेगळे भौगोलिक आकर्षण असलेला नाशिक मतदारसंघ राज्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. नाशिकला राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये धार्मिक महत्त्व आहे. या ठिकाणी दर १२ वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन केले जाते. तसेच रामायणाशी असलेला संबंध आणि राम मंदिराचे उद्घाटन यामुळे धार्मिक फॅक्टरच महत्त्वाचा ठरेल अशी चर्चा होती. उत्तर महाराष्ट्रावर वर्चस्व मिळवायचं असेल तर नाशिक ताब्यात असणे महत्त्वाचे. यामुळे सर्व राजकीय पक्ष नाशिकचा किल्ला सर करण्यासाठी तयारी करत असतो. नेत्यांना ही गोष्ट जशी माहिती आहे तशीच मतदार सुज्ञ असल्याने त्यांनी एका अशा पक्षास किंवा विचारधारेला पाठिंबा दिलेला नाही. वेळ, प्रसंग आणि राजकीय वातावरण पाहून त्यांनी आपला उमेदवार निवडल्याचे दिसते. एकेकाळी म्हणजे आणीबाणीपूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा गड होता. १९७७ नंतर काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला शिवसेनेने आव्हान दिल्याचे दिसते. काही काळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही आपला झेंडा फडकवला आहे. मात्र, एकाच पक्षाच्या किंवा नेत्यांच्या मागे जाण्याचे मतदारांनी नाकारलेले आहे.
 
इतिहास 
या मतदारसंघावर नजर टाकली तर बराच काळ काँग्रेसने वर्चस्व ठेवल्याचे दिसते. १९५२ मध्ये काँग्रेसचे गोविंद देशपांडे, १९५७ मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनचे भाऊराव गायकवाड, १९६२ मध्ये पुन्हा काँग्रेसचे गोविंद देशपांडे निवडून आले होते. १९६३ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे यशवंराव चव्हाण बिनविरोध  निवडून गेले होते. १९७६ आणि १९७१ मध्ये काँग्रेसचे भानुदास कवडे, १९७७ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे विठ्ठलराव हांडे, १९८६ मध्ये काँग्रेसचे प्रताप वाघ आणि १९८४ मध्ये मुरलीधर माने विजयी झाले होते. १९८९ मध्ये भारतीय जनता पक्षाचे दौलतराव आहेर विजयी झाले होते. १९९१ मध्ये काँग्रेसचे वसंतराव पवार, १९९६ मध्ये शिवसेनेचे राजाराम गोडसे, १९९८ मध्ये काँग्रेसचे माधवराव पाटील, १९९९  मध्ये शिवसेनेचे उत्तमराव ढिकळे, २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे देविदास पिंगळे आणि २००९ मध्ये समीर भुजबळ विजयी झाले होते. ही निवडणूक अतिशय रंगतदार झाली होती. समीर भुजबळ २२ हजारांच्या फरकाने निवडून आले तेव्हा त्यांना २ लाख ३८ हजार मते पडली होती. त्यावेळी मनसेत असलेल्या हेमंत गोडसेंना २ लाख १६ हजार मते  मिळाली होती. शिवसेनेकडून उभे राहिलेले दत्ता गायकवाड यांना १ लाख ५८ हजार मते पडली होती. मनसेची ओसरणारी हवा आणि शिवसेनेला असणारा व्यापक पाठिंबा याचा विचार करून गोडसे यांनी शिवसेनेचा हात धरला आणि दोन वेळा खासदार झाले.
   
दोघेच आले सलग निवडून 
केवळ १९६७, १९७१ मध्ये काँग्रेसचे भानुदास कवडे आणि २०१४, २०१९ मध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना सलग दोन वेळा निवडून येता आले आहे. १९९१ नंतर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीत या जागेवरील वर्चस्वासाठी स्पर्धा झाल्याचे दिसते. मध्यंतरी राज ठाकरेंच्या मनसेनं नाशिकमध्ये चांगली कामगिरी केली. त्यांना मनपाची सत्ताही मिळाली. २००९ मध्ये अवघ्या २० हजारांच्या फरकानं खासदारकीची संधी हुकली. त्यानंतर मात्र मनसेची हवा नाशिकमधून ओसरल्याचे दिसते. १९९१ नंतर कोणालाही सलग दोनदा विजयी होता आले नव्हते. शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी २०१९ मध्ये ही परंपरा मोडत सलग दुसऱ्यांदा खासदारकी मिळवली. यावेळी त्यांना हॅटट्रीकचे संधी होती. मात्र, त्यांनी शिंदे सेनेची वाट धरल्याने ती हुकली. 

भुजबळांना धोबीपछाड  
२०१४ आणि २०१९ मध्ये गोडसे यांनी भुजबळ कुटुंबातील सदस्यांना धोबीपछाड दिली. पहिल्यांदा छगन भुजबळ यांचा तर २०१९ मध्ये समीर भुजबळ यांचा पराभव त्यांनी केला. २०१४ ला मोदी लाटेत २ लाखांच्या आसपास मतांनी त्यांनी छगन भुजबळांसारख्या नेत्याला पराभवाची धूळ चारली होती. पुलवामाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या देशप्रेमाच्या लाटेत ३ लाखांच्या फरकाने त्यांनी समीर भुजबळ यांना पराभूत केले होते. २०१४ ला गोडसेंना ४ लाख ९४ हजार तर २०१९ ला ५ लाख ६३ हजार मते मिळाली होती.  २०२४ च्या निवडणुकीत ठाकरे आणि शिंदे सेनेमध्ये थेट निवडणूक झाली. मुंबईबाहेर झालेल्या या लढतीत मतदारांनी ठाकरे सेनेच्या बाजूने निकाल देताना राजाभाऊ वाजे यांना तब्बल ६ लाख १६ हजार मतांचे दान टाकले. शिंदे सेनेचे गोडसे यांना ४ लाख ५४ हजार मते मिळाली. वंचितचे करण गायकर यांना ४७ हजार तर निवडणुकीपूर्वी मोठी हवा झालेल्या शांतिगिरी महाराजांना जेमतेम ४४ हजार मते मिळाली. २०१४ आणि २०१९ ला गोडसेंना मिळालेली मते आणि २०२४ ला वाजेंना मिळालेली मते पाहिली तर मतदारांनी आपला कौल निसंदिग्धपणे ठाकरे सेनेच्या बाजूने दिल्याचे दिसते.     

भुजबळांची माघार
या मतदारसंघामध्ये नाशिक पूर्व, मध्य आणि पश्चिम याबरोबरच सिन्नर, देवळाली आणि इगतपुरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यातील तीन मतदारसंघांमध्ये भाजपचे तर दोन मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि एका ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. नाशिक पूर्व, मध्य आणि पश्चिम या शहरातील मतदारसंघात भाजपचे राहुल ढिकळे, देवयांनी फरांदे, सीमा हिरे हे आमदार आहेत. सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे, देवळालीत सरोज अहिरे तर इगतपुरीत काँग्रेसचे हिरामण खोसेकर आमदार आहेत. भाजपचे तीन आमदार असल्याने या मतदारसंघावर भाजपचा डोळा होता. आपली राजकीय ताकद आणि भुजबळांना असणारा पाठिंबा याच्या जोरावर हा मतदारसंघ ताब्यात घेण्याचा इरादा होता. भुजबळ यांना नाशिकमधून निवडणूक लढविण्याची तीव्र इच्छा होती. मात्र, शिंदे सेनेने या जागेवरील हक्क सोडण्यास नकार दिल्याने त्यांना अखेर रिंगणातून माघार घ्यावी लागली. दिल्लीतील चर्चेत आपले नाव पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच सूचविल्याची माहिती मिळाल्याने आपण चाचपणी सुरू केली. सगळ्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे आपण कामाला लागल्याचे भुजबळ यांनी जाहीर केले होते.  त्यातच भाजपच्या देवयानी फरांदेही दिल्ली गाठण्यास इच्छुक होत्या. त्यांनी तशी तयारीही चालवली होती. मात्र, शिंदे सेनेने या मतदारसंघासाठी आग्रह धरल्याने भाजपने आग्रह सोडून दिला. ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि शरद पवार गटाच्या गोकुळ पिंगळे यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनीही गेल्या वर्षभरात आपल्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून तयारी सुरू केली होती. त्यांच्या नावाचीही नाशिकमधून चर्चा होती. त्यातच धार्मिक प्रस्थ असलेल्या शांतिगिरी महाराजांचीही चर्चा होती. भाजपने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी त्यांची भूमिका होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest