आमदार विनायक मेटे यांच्या 34 वर्षीय पुतण्याने घेतला गळफास
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे (MLA Vinayak Mete)यांच्या पुतण्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीडच्या राजेगाव परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. गेल्या वर्षी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले होते. यातून मेटे कुंटूंब सावरत असतानाच ही दु:खद घटना घडली आहे.
सचिन त्रिंबक मेटे (Sachin Trimbak mete)(वय 34) असे विनायक मेटे यांच्या या पुतण्याचे नाव आहे. सचिन याने (Sachin Mete Suicide ) आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान सचिन यांच्या आत्महत्येमागे नेमंक काय कारण आहे यासंदर्भात पोलीसांनी अधिक तपास सुरु केला आहे.
सचिन याच्या आत्महत्येची बातमी समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन त्यानंतर सचिन याच्या अकाली मृत्यूमुळे मेटे परिवारांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.