Disha Salian Case: आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ!

मुंबई: गँगरेप करून दिशा सालियानचा मर्डर करण्यात आला. माझ्याकडे या संदर्भात सर्व पुरावे आहेत. आजही दिशा सालियनचे आरोपी विधान भवनात मोकाट  फिरत आहेत. महाविकास आघाडी सरकार काळात मुंबई पोलीस आयुक्तांवर प्रचंड दबाव होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 12 Jul 2024
  • 12:10 pm
Disha Salian Case, Aditya Thackeray, Nitesh Rane

संग्रहित छायाचित्र

गँगरेप करून दिशा सालियानचा मर्डर, आरोपी विधान भवनात मोकाट फिरताहेत, नितेश राणे देणार पोलिसांना पुरावे?

मुंबई: गँगरेप करून दिशा सालियानचा मर्डर करण्यात आला. माझ्याकडे या संदर्भात सर्व पुरावे आहेत. आजही दिशा सालियनचे आरोपी विधान भवनात मोकाट  फिरत आहेत. महाविकास आघाडी सरकार काळात मुंबई पोलीस आयुक्तांवर प्रचंड दबाव होता. उपायुक्तांवर दबाव होता. आदित्य ठाकरे ८ जून आणि १३ जूनला पार्टीत उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांचे वडील मुख्यमंत्री होते म्हणून सर्व काही लपवण्यात आले अशा आशयाचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर येत आहे. भाजप नेते नितेश राणे यांना दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले आहे. बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिने सातव्या मजल्यावरून उडी घेत स्वत:ला संपवले होते. पण दिशा सालियन हिचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता. नारायण राणे यांच्या पाठोपाठ त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनीदेखील दिशा सालियन मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याच प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी नितेश राणे यांना चौकशीचे समन्स बजावले आहे.नितेश राणे यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर पत्रकारांनी विधान भवन परिसरात त्यांना याबाबत प्रश्न विचारला. त्यावर नितेश राणे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या हातात अजून समन्स आला नाही. मी उद्याच या प्रकरणी स्टेटमेंट देण्यासाठी जाणार आहे. आदित्य ठाकरे ८ जून आणि १३ जूनला कुठे होते? याची सत्यता सांगावी, असे नितेश राणे म्हणाले आहेत.

नितेश राणे काय म्हणाले?
दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आम्हाला यापूर्वी बोलावले होते. मी मुबंई पोलिसांना सर्व योग्य ते पुरावे देणार आहे. काही महत्त्वपूर्ण पुरावे आदित्य ठाकरे संदर्भातही मुंबई पोलिसांना मिळाले आहेत, असा मोठा दावा नितेश राणे यांनी केला आहे. आता सरकार महायुतीचे आहे. आम्ही पुण्याच्या अग्रवालला सोडले नाही. मिहिर शाहाला सोडले नाही आणि आदित्य ठाकरे यांनाही सोडणार नाही. तेव्हाचे सीसीटीव्ही डिलिट करण्यात आले. ८ जूनच्या मस्टरची दोन्ही पाने फाडण्यात आली. आदित्य ठाकरे यांचे ८ जून आणि १३ जूनचे मोबाईल टॉवर लोकेशन काय आहे ते तपासले पाहिजे. मी अगोदरपासून हे सांगतो आहे. या दोन्ही ठिकाणी आदित्य ठाकरे यांचा हस्तक्षेप आहे. ते पार्टीत तिथे उपस्थित होते. तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते. वडील मुख्यमंत्री होते त्यामुळे सगळ्या गोष्टी लपवण्यात आल्या. पण आता मुंबई पोलिसांना जी माहिती पाहिजे ती सर्व द्यायला मी तयार आहे, असेही नितेश राणे म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest