रत्नागिरीमधील शिवसृष्टीतील मावळ्याच्या पुतळ्याची विटंबना

रत्नागिरी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना ताजी असताना रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे असलेल्या शिवसृष्टीमधील मावळ्यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका संशयितास अटक केली असून ही घटना दारूच्या नशेत झाली असावी असा अंदाज आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 3 Sep 2024
  • 12:19 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

एका संशयितास अटक, दारूच्या नशेत घटना झाल्याचा अंदाज

रत्नागिरी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना ताजी असताना रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे असलेल्या शिवसृष्टीमधील मावळ्यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका संशयितास अटक केली असून ही घटना दारूच्या नशेत झाली असावी असा अंदाज आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून शिवसेना पक्षाने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. रत्नागिरी  शहरातील मारुती मंदिर येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवसृष्टी उभारली आहे. तेथील काही मावळ्यांची विटंबना झाल्याचे सोमवारी सकाळी निदर्शनास आले. त्यानंतर लगेचच याची तत्काळ दखल घेऊन शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मावळ्यांची विटंबना करणाऱ्या आरोपीला तत्काळ पकडून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

या संदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, ज्येष्ठ नेते राजन शेट्ये, विजय खेडेकर, अभिजीत दुडे, प्रशांत सुर्वे, दीपक पवार यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका संशयित इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुतळ्याची विटंबना ही दारूच्या नशेत केली असवी असे सांगितले जात आहे. या संतापजनक प्रकाराचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest