काँग्रेसची विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी समोर आली. या यादीत 23 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. याआधी काँग्रेसने पहिल्या यादीत ४८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. आज (२६ ऑक्टोबर) दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून मधुकर देशमुख, सावनेरमधून अनुजा सुनील केदार, नागपूर दक्षिणमधून गिरीश पांडव, जालन्यातून विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल व निलंगा येथून अभयकुमार साळुंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Congress Candidate 2nd List)
कोणाला कोणत्या मतदारसंघातून मिळाली संधी?
- डॉ. राजेश तुकाराम मानवतकर - भुसावळ (राखीव)
- डॉ. स्वाती संदीप वाकेकर - जळगाव (जामोद)
- महेश गांगणे - अकोट
- शेखर प्रमोदबाबू शेंडे - वर्धा
- अनुजा सुनील केदार - सावनेर
- गिरीश कृष्णराव पांडव - नागपूर दक्षिण
- सुरेश यादवराव भोयर - कामठी
- पूजा गणेश थावकर - भंडारा (राखीव)
- दलीप वामन बनसोड - अर्जुनी - मोरगाव (राखीव)
- राजकुमार लोटुजी पुरम - आमगाव (राखीव)
- प्रो. वसंत चिंडूजी पुरके - राळेगाव
- अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मंगुळकर - यवतमाळ
- जितेंद्र शिवाजीराव मोघे - आर्णी (राखीव)
- साहेबराव दत्तराव कांबळे - उमरखेड (राखीव)
- कैलास किसनराव गोरंट्याल - जालना
- मधुकर कृष्णराव देशमुख - औरंगाबाद पूर्व
- विजय गोविंद पाटील - वसई
- काळू बधेलिया - कांदीवली पूर्व
- यशवंत जयप्रकाश सिंह - चारकोप
- गणेश कुमार यादव - सायन कोळीवाडा
- हेमंग ओगळे - श्रीरामपूर (राखीव)
- अभयकुमार सतीशराव साळुंखे - निलंगा
- गणपतराव आप्पासाहेब पाटील - शिरोळ