Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे यांना होऊ शकते अटक

शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (shrikant shinde) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

Eknath Shinde

मुख्यमंत्री शिंदे यांना होऊ शकते अटक

खासदार संजय राऊत यांचा दावा, एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांनी गुन्हेगारीचा पैसा स्वीकारल्याचाही केला आरोप

मुंबई : शिवसेना (Shivsena)  उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut)  यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (shrikant shinde)  यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याचा संदर्भ देत त्यांनी एकनाथ शिंदे यांना अटक होऊ शकते, असा दावा केला. देशात या पद्धतीने आतापर्यंत विरोधकांना ईडीने अटक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगारीचा पैसा स्वीकारला आहे. या संदर्भात भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे स्टेटमेंट आहे. गणपत गायकवाड म्हणतात, माझे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. गणपत गायकवाड यांच्या आरोपानुसार आता त्याचा शोध घेतला पाहिजे. आमच्या माहितीनुसार, हा पैसा शंभर कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांना या प्रकरणात अटक करता येईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार या गुन्ह्यात पुरावा लागत नाही. या प्रकरणात स्टेटमेंट आले आहे. हे स्टेटमेंट हाच पुरावा असतो. त्यामुळे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितल्यानुसार आता किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात कारवाईची मागणी करायला हवी. या कायद्याचा गैरवापर होत आहे. आता या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई केली तर ईडीची भूमिका भ्रष्टाचारविरोधी असल्याचे स्पष्ट होईल, असेही राऊत म्हणाले आहेत.

खासदार श्रीकांत शिंदेंचाही समाचार  

बाळराजांचा वाढदिवस राज्यभर साजरा झाला. ते हाडवैद्य आहेत. त्या हाडवैद्यांना आम्ही खासदार केले. त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला. त्यांना आमच्याही शुभेच्छा आहेत. परंतु बाळराजे यांच्या खास माणसांवर भाजप आमदार गोळीबार करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाला गुंडांची फौज होती. त्या संदर्भातील एक फोटो मी ट्विट केला आहे. या संदर्भात अनेक गुंडांचे फोटो आहेत. हे गुंड कोण आहेत, त्याची पोलिसांनी चौकशी करावी. गुंडांचे संघटन बनवण्यासाठी पोलिसांवर जबाबदारी दिली गेली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायद्याची चाड असेल तर ते कायद्याने काम करतील. ते एकनाथ शिंदे यांच्या दहशतीखाली आहेत का? हे त्यांनी सांगावे. शिंदे गटाचे खासदार परदेशात गेले होते. त्यांचा व्हीडीओ मला मिळाला आहे. तो लवकरच बाहेर येईल. शिंदे गँगचे खरे चरित्र काय आहे, हे समोर येईल. त्यासाठी वेट अँड वॉच करा, असेही राऊत म्हणाले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest