Chhatrapati Shivaji maharaj Statue : छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा कोसळला, शिवप्रेमी नाराज; पंतप्रधानांच्या हस्ते अनावरणानंतर ८ महिन्यात दुर्घटना

शिवप्रेमींसाठी संतापजनक बातमी समोर आली आहे. ८ महिन्यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Chhatrapati Shivaji maharaj Statue

Chhatrapati Shivaji maharaj Statue : छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा कोसळला, शिवप्रेमी नाराज; पंतप्रधानांच्या हस्ते अनावरणानंतर ८ महिन्यात दुर्घटना

सिंधुदुर्ग : शिवप्रेमींसाठी संतापजनक बातमी समोर आली आहे. ८ महिन्यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज (सोमवार) रोडी मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे दुपारच्या सुमारास हा महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे ५ कोटी रुपये खर्चकरून ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आलं होतं.पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Chhatrapati Shivaji maharaj Statue)

४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे मालवणच्या समुद्रकिनारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता.या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते.महाराजांचा पुतळा सुमारे ४३ फूट उंच आहे. जमिनी पासून बांधकाम १५ फूट तर त्यावर २८ फूट उंच हा पुतळा उभारण्यात आला होता. गेले दोन तीन दिवस किनारपट्टी भागात वादळी वारे व मुसळधार पाऊस सुरू आहे. यातच आज दुपारी वादळी वाऱ्यामुळे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा पायातून तुटून खाली कोसळला. प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुतळा पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवप्रेमींनी राजकोट येथे धाव घेतली. तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हेही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त बनले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली आहे.तसेच पुतळ्याच्या ठिकाणी कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

या घटनेनंतर सर्वत्र शिवप्रेमींमध्ये नाजारी पसरल्याचे दिसून आले. कुडाळचेआमदार वैभव नाईक यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला ते म्हणाले, की, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने एक वर्षाच्या आतच पुतळा कोसळला आहे. महाराजांचा पुतळा कोसळल्याने आम्हाला दु:ख होत असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. केवळ सहा महिन्यापूर्वीत कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला होता . ज्यावेळी काम सुरू होते त्यावेळी स्थानिक लोकांनीही कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले जे लोक कामाच्या दर्जाला विरोध करत होते, ते पुतळा उभारण्याच्या विरोधात असल्याचे म्हटले गेले. ४०० वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा एकही चिराही ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळला आहे. या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अन्यथा शिवप्रेमांकडून जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल. तसेच सर्व शिवप्रेमींनी शांततेत आंदोलन करावे, असे आवाहनही वैभव नाईक यांनी केले आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest