MPSC : एमपीएससीच्या ऑप्टींग आऊटसाठी लागली बोली

एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेची सर्वसाधारण (MPSC) गुणवत्ता जाहीर करण्यात आली आहे. यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. परंतु त्यापुर्वी या परीक्षेतून किंवा पद नको असल्यास ऑप्टींग आऊट या पर्यायाची निवड करण्यासाठी एमपीएससीने उमेदवारांना मुदत दिली आहे.

MPSC

एमपीएससीच्या ऑप्टींग आऊटसाठी लागली बोली

शेवटचा दिवस असल्याने होतेय पैशांची मागणी ; गाडी विकायची आहे, १० लाख रुपये मोजायची तयारी ठेवा

पुणे: एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेची सर्वसाधारण (MPSC) गुणवत्ता जाहीर करण्यात आली आहे. यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. परंतु त्यापुर्वी या परीक्षेतून किंवा पद नको असल्यास ऑप्टींग आऊट या पर्यायाची निवड करण्यासाठी एमपीएससीने उमेदवारांना मुदत दिली आहे. या मुदतीची आजची शेवटीची तारीख असून रात्री ११.५९ वाजेपर्यत पर्याय निवडता येणार आहे. त्यामुळे ऑप्टींग आऊटमधून (Opting out)  बाहेर पडण्यासाठी काही उमेदवारांकडून थेट पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार दोन तीन उमेदवारांनी सीविक मिररपुढे कथन केला. तसेच पदासाठी बोली लावली जात असल्याची माहिती उमेदवारांनी सांगितली.

सर्वसाधारण यादीमध्ये नाव आलेल्या उमेदवाराला त्याच्याकडे असलेल्या पदापेक्षा खालच्या वर्गाचे पद मिळाले असेल तर तो  ऑप्टींग आऊट हा पर्याय वापरुन स्पर्धेतून बाहेर पडणार हे नक्की आहे. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत प्रतिक्षेत असलेल्या उमेदवाराकडून काही आर्थिक लाभ मिळतोय का याची वाट पाहिली जात आहे. तसेच एख्याद्या उमेदवाराने पद सोडले तर आपल्याला सरकारी नोकरी मिळेल अशी आशा लागली आहे. हातातोंडाशी आलेला घास जाऊ नये, असे त्या उमेदवारासह त्याच्या कुंटूंबियांना वाटत आहे. त्यामुळे पैसे मोजण्याची तयारी ठेवली जात असल्याची चर्चा स्पर्धा परीक्षा क्षेत्रात रंगली आहे. आज दुपारी एकच्या सुमारात एका उमेदवाराला असाच एक अनुभव आला असून तो अनुभव सीविक मिररपुढे व्यक्त केला आहे.

ऑप्टींग आऊटची खूप दिवसापासून प्रयत्न करत आहे. पदावर असणाऱ्या उमेदवाराला मी स्वतःहून संपके साधला. त्यांना परिस्थिती समजावून सांगितली की, आपण जर ऑप्टींग आऊट केले तर मला संधी मिळू शकते. मला नोकरीची गरज असल्यामुळे आपण पद घेणार नसाल तर कृपया ऑफ आउट करावे. मात्र यावर तीन ते चार दिवस कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आचानक आजच्या शेवटच्या दिवशी त्यांना माझ्याशी संपर्क साधला. सध्या रुजू असलेल्या पदाची नोकरी नको असलेल्या जिल्ह्यात मिळाली तर मी ते पद स्वीकारणार नाही. त्यावर मला शंका आली. त्यानंतर सरकारी नोकरी मिळाली तर कोणत्याही ठिकाणी जाऊनच काम करावे लागणार आहे. असे सांगितल्यानंतर तुम्ही काही बेनिफिट (फायदा) शोधत आहात का ? असे त्यांना म्हणाताच त्यांनी एक इंस्टाग्राम आयडी पाठवला. व त्यावर बोलायला सांगितले. समोरुन बोलणारी व्यक्ती म्हणाली की, "लवकर लवकर बोला गाडी विकतोय, त्याचे तुम्ही किती देणार, माझी परिस्थिती नाही, त्यांनी जी गाडी विकायला काढली आहे, ती दहा लाख रुपयांना आहे.'' यानंतर माझी पैसे भरण्याची परिस्थिती नाही. असे सांगताच त्यांना समोरचा संपर्क बंद झाला. असा धक्कादायक अनुभव एका उमेदवाराने सीविक मिररला सांगितला. तर इतर उमेदवारांना देखील असाच अनुभव येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

ज्या उमेदवारांकडे एक पद असताना त्यापेक्षा खालील वर्गाचे पद त्यांना मिळाले असेल तर त्यांनी ऑप्टिंग आऊट का करत नाही, याची  चौकशी करण्यात यावी. तसेच एक उमेदवार एक पद या पद्धतीने आयोगाने धोरण तयार करायला पाहिजे. संविधानाने उमेदवारांना कितीही परीक्षा देण्याची संधी दिली असली तरी त्याला एकच पदावर काम करावे लागते. पण जर एकच उमेदवार सहा ते सात पदं घेत असेल आणि पद एक जॉईन करत असेल तर बाकीचे पद रिक्त राहतात आणि इतर उमेदवारांचे नुकसान होतं. त्यामुळे एमपीएससीने याबाबत कडक धोरण तयार करणे आवश्यक आहे. अशी मागणी आता उमेदवारांकडून जोर धरु लागली आहे. 

परीक्षेची सध्य परिस्थिती...

राज्येसेवेची १८ जानेवारी रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली. 

 २० मार्च रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर 

२७ मार्च पर्यंत ऑप्टींग आऊट हा पर्याय निवडण्याची अंतिम मुदत 

एकूण ६२३ पदांसाठी पद भरती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest