Jarange Vs Bhujbal : 'तू आधी ग्रामपंचायतीला निवडून ये'; मी संघर्ष करून मोठा झालोय, तुझं काय?; भुजबळांचे जरांगे पाटलांना ओपन चॅलेंज

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यातील शाब्दिक संघर्ष थांबायचे नाव घेत नाही.

Jarange Vs Bhujbal

'तू आधी ग्रामपंचायतीला निवडून ये'; मी संघर्ष करून मोठा झालोय, तुझं काय?

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  यांच्यातील शाब्दिक संघर्ष थांबायचे नाव घेत नाही. जरांगेंनी आरोप केला की भुजबळ त्याला उत्तर देतातच. एल्गार मेळाव्यात भुजबळांच्या टीकेला उत्तर देताना मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांना डिवचताना भुजबळ यांनी एकेरी भाषा वापरली आहे.  मनोज जरांगे यांचा एकेरी उल्लेख करत भुजबळ म्हणाले, त्या जरांगेला जाऊन सांगा, तू आधी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभा राहा आणि निवडून येऊन दाखव. तू आधी नीट उभा राहा मग बोल. (Jarange Vs Bhujbal)

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या आठवड्यात अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात भाषण करताना मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास कडाडून विरोध दर्शवला. भुजबळांनी त्यावेळी कोल्हापूरमधील नाभिक समाजातील एका तरुणाबरोबर झालेल्या कथित घटनेचा उल्लेख करून नाभिक समाजाला मराठा समाजावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. नाभिकांनी मराठ्यांच्या दाढ्या करू नये, केस कापू नये असे आवाहन केले होते.  भुजबळांच्या या आवाहनानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाली. त्यानंतर भुजबळ यांनी या प्रकरणी स्पष्टीकरणही दिले. दरम्यान, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच जरांगे पाटील म्हणाले, भुजबळ अशी वक्तव्ये करत राहिले तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही ते निवडून येणार नाहीत. यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, मी २५ वर्षे मुंबई महापालिकेत होतो. दोन वेळा मुंबईचा महापौर झालो आहे. तसेच दोन वेळा मुंबईतून आमदार म्हणून निवडून आलो आहे. त्यानंतर चार वेळा येवल्यातून आमदार म्हणून निवडून आलो. उगीच काहीही वक्तव्ये करू नको. मनोज जरांगे ओबीसींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भुजबळ यांनी यावेळी केला. तसेच ते म्हणाले, मनोज जरांगे आमच्यात फूट पाडण्यासाठी काहीही वक्तव्ये करतो. कधी म्हणतो मी धनगरांची बाजू लढणार, तर कधी नाभिकांच्या बाजूने लढणार. परंतु, तू आणि तुझे सहकारी आमच्या आरक्षणावर डल्ला मारताय ते आधी थांबव. तू आमच्या आरक्षणावर डल्ला मारणे थांबवलेस, ओबीसी समाजातून आरक्षण घेण्यासाठी चालवलेला प्रयत्न थांबवलास तर तुझे आमच्यावर खूप उपकार होतील. तू तुझी मागणी मागे घे, तसे केल्यास ओबीसी समाज तुझे उपकार मान्य करेल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest