दिवाळी आधी की दिवाळीनंतर…? महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कधी?; मोठी अपडेट काय?

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील जवळपास सर्वच पक्षांनी तयारी देखील सुरु केली आहे. निवडणूका कधी होणार याकडे सर्वांने लक्ष लागून असताना महत्वाची बातमी समोर आली आहे.

Maharashtra Assembly Election

दिवाळी आधी की दिवाळीनंतर…? महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कधी?; मोठी अपडेट काय?

मुंबई : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील जवळपास सर्वच पक्षांनी तयारी देखील सुरु केली आहे. निवडणूका कधी होणार याकडे सर्वांने लक्ष लागून असताना महत्वाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आढवड्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता सुत्राकडून वर्तविण्यात आली आहे.  

राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असल्याची चर्चा होती. मात्र आता ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच दिवाळी नंतर होणार असल्याची माहिती सुत्राकडून देण्यात आली आहे.तसेच १४ किंवा १५ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे.  नियमानुसार २६ नोव्हेंबर २०२४ रोजी नवी विधानसभा अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे एैण पावसाळ्यात आचारसंहिता प्रचाराची लगबघ कशासाठी असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगात तुर्तास निवडणुकीसंदर्भात कोणत्याही हालचाली नसल्याचे दिसून येत आहे. 

१५ सप्टेंबर नंतर आचारसंहिता तसेच ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूका होतील असा अंदाज याआधी व्यक्त करण्यात आला होता. मात्र सप्टेंबर मध्ये पावसाचे दिवस सोबतच गणपती उत्सव या दरम्यान प्रचार करणं अवघड असतं अस मत महायुतीतील काही नेत्यांनी व्यक्त केलं. नंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी आहे. त्यामुळे निवडणूका दिवाळी नंतर घ्याव्यात असा विचार सुरु असल्याचे बोललं जात आहे. सोबतच दिवाळीनंतर निवडणूक घेण्याबाबत महायुतीतही सूर असल्याचे बोलल जात आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest