बदलापूर, पुणे, अकोला आणि आता धाराशिव!

धाराशिव: बदलापूर, पुणे, अकोल्यात झालेल्या अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता धाराशिवमध्येही सर्वांना हादरवून टाकणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील भूम येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्याची घटना समोर आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 26 Aug 2024
  • 11:44 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

भूम येथे अल्पवयीन मुलीवर पाच जणांचा अत्याचार, चौघांना अटक एक फरार

धाराशिव: बदलापूर, पुणे, अकोल्यात  झालेल्या अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता धाराशिवमध्येही सर्वांना हादरवून टाकणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील भूम येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्याची घटना समोर आली आहे. या मुलीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून एक जण फरार असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

राज्यात महिलांवरील अत्याचार काही थांबण्याचे नाव घेत नाही. आता धाराशिवमध्येही एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे. या मुलीवर पाच तरुणांनी अत्याचार केले. याबाबत या मुलीने पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. मुलीची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे तिला तातडीने धाराशिवच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तिचा जबाब नोंदवण्यात आला. त्यात तिने आपल्यावर झालेली आपबिती सांगितली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर एक जण फरार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गौर हसन यांनी दिली आहे.

या आधी बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली होती. त्यानंतर बदलापूरमध्ये जनक्षोभ झाला होता. रेल रोको करण्यात आला. ज्या शाळेत ही घटना झाली तिथे जमावाने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले होते. महाविकास आघाडीने तर महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. पण बंदला न्यायालयाने बेकायदेशीर ठरवल्यानंतर राज्यभरात निषेध मोर्चे आणि मूक मोर्चे काढण्यात आले. बदलापूरची घटना होत असतानाच पुणे, अकोला इथेही अशाच घटना समोर आल्या होत्या. बदलापूर प्रकरणात सरकारने कडक कारवाईचे आश्वासन दिले. त्यानुसार कारवाईही केली गेली. सर्व आरोपींना अटक करण्यात आली. एसआयटीही नेमण्यात आली. संबंधित शाळेवरही कारवाई झाली. आरोपीला लवकर शिक्षा करण्यासाठी ही तातडीने पावले उचलण्याची घोषणा झाली. राज्यात अशा घटना खपवून घेणार नाही, असे मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांनीही सांगितले. पण त्याचा काही एक उपयोग झालेला नाही असेच धाराशिवच्या घटनेवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे जनतेमध्ये संताप निर्माण झाला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest