Maratha Reservation : आम्ही आरक्षण देणारच, मराठा समाजाने धीर धरावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

आमचे सरकार मराठा समाजाला (Maratha society) न्याय देणारच त्यामुळे सर्व मराठा बांधवांनी धैर्य आणि धीर ठेवावा, कुणीही टोकाची पाऊले उचलू नये. मराठा समाजाला आरक्षण देणारच असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sun, 29 Oct 2023
  • 10:39 am
Maratha Reservation

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर : आमचे सरकार मराठा समाजाला (Maratha society) न्याय देणारच त्यामुळे सर्व मराठा बांधवांनी धैर्य आणि धीर ठेवावा,  कुणीही  (Maratha Reservation)टोकाची पाऊले उचलू नये.  मराठा समाजाला आरक्षण देणारच असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. कोल्हापूर येथे रात्री उशिरा त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही ग्वाही दिली आहे. (Maratha Andolan)

 शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील हे दुसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची आम्हाला चिंता आहे. यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. या आरक्षणात सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी दाखवल्या सध्या त्यावर काम सुरू आहे. तसेच कुणबी दाखले देण्याबाबत जी शिंदे समिती नेमण्यात आली आहे ती चांगले काम करत आहे. 

आतापर्यंत  आठ ते दहा हजार जुन्या नोंदी शोधल्या गेल्या आहेत. त्या हैद्राबाद येथे जाऊन त्या नोंदी तपासल्या जात आहेत. त्यामुळे या सर्व कामाला काही कालावधी लागणार असून मराठा समाजाने शांतता राखावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest