युवकमित्र परिवार संस्थेतर्फ पुण्यात राज्यस्तरीय युवा संमेलन
राज्य शासनाने युवक कल्याण कार्याचा प्रभावी योजनांना तत्काळ मान्यता देऊन राज्य युवा धोरण तत्काळ प्रसिद्ध करावे,शासकीय नोकरभरतीत गैरप्रकार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी कायदा तयार करण्यात यावा.क्रीडा विभाग व युवकल्याण विभाग स्वतंत्र स्थापन करून युवक कल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात असे ठराव युवकमित्र परिवार नंदुरबार या संस्थेमार्फत पत्रकार भवनात आयोजित ५ व्या राज्यस्तरीय युवा संमेलनात मंजूर करण्यात आले.
राष्ट्रीय युवा दिन,राजमाता आई जिजाऊ जयंती,स्वामी विवेकानंद जयंतनिमित्त पत्रकार भवन येथे युवा समलेंन आयोजित करण्यात आले होते.यावेळी ज्येष्ठ सनदी अधिकारी तथा संत साहित्याचे अभ्यासक रंगनाथ नाईकडे यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी बुक क्लब चे संस्थापक तथा पुणे मनपा स्वच्छता अभियानाचे राजदूत अविनाश निमसे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मंथन फाऊंडेशनच्या अध्यक्ष आशाताई भट्ट, अंबामाता स्वयंरोजगार संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई नागुल, पुणे महानगर परिवहन महामंडळ कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खराडे, युवकमित्र संस्थेचे संस्थापक प्रवीण महाजन, सद्गुरू सेवा संस्थेचे अध्यक्ष सचिन म्हसे यांच्यासह राज्यातील युवक,युवती तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राज्यात युवा व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवांना युवा प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रसंगी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
यावेळी उदघाटक रंगनाथ नाईकडे यांनी आजचा युवा हा या देशाचा कणा असून युवांना प्रामाणिकपणे देशसेवा केल्यास देशासमोरील अनेक आव्हाने नष्ट होतील तसेच आपला सुंदर असा भारत देश जगात प्रथम क्रमांकावर असेल.कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश निमसे यांनी युवकांना स्वच्छता व पर्यावरण संतुलन, vyasnmukt राखण्यासाठी करावयाच्या उपयोजनावर सल्ला दिला.
बुधवार पेठेत देहविक्री करणाऱ्या महीलाच्या सबलीकरणासाठी कार्य करणाऱ्या मंथन फाऊंडेशनच्या अध्यक्षा आशाताई भट्ट यांनी उपेक्षित असलेल्या महिलांच्या सबलीकरणासाठी व त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्यावर प्रकाशझोत टाकला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ.सुनील धनगर यांनी केले तर आभार नरेंद्र उमाळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्तिक चव्हाण, बादलसिंग गिरासे,मयूर जाधव,दिनेश चौधरी यांचे सहकार्य लाभले.