महिलांना शस्त्र बाळगण्याची संमती द्या, शिंदे गटाच्या नेत्याची मागणी

अमरावती: महाराष्ट्रात सध्या महिला सुरक्षेचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका प्रथितयश शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. महाराष्ट्रासह देशभर या घटनेचे पडसाद उमटले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 26 Aug 2024
  • 11:56 am

संग्रहित छायाचित्र

सकल हिंदू समाजाच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या नेत्याची मागणी

अमरावती: महाराष्ट्रात सध्या महिला सुरक्षेचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका प्रथितयश शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. महाराष्ट्रासह देशभर या घटनेचे पडसाद उमटले. ही घटना ताजी असतानाच पुढील काही दिवसांत पुणे, सातारा, अकोला यासारख्या काही भागांतही महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्या. या सर्व घटनांमुळे राज्यातील सत्ताधारी महायुती सरकार टीकेच्या केंद्रस्थानी असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्याने महिलांना बंदूक वापरण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

अमरावती जिल्ह्यातील शिंदे गटाचे शिवसेना नेते नानकराम नेभनानी यांनी अमरावती जिल्ह्यातील महिलांना बंदूक वापरण्याचा परवाना द्यावा, अशी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. बांगलादेशात शेख हसीना यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर स्थानिक धर्मांध मुस्लीम व्यक्तींकडून हिंदू समाजावर हल्ले वाढले होते. बांगलादेशात अनेक ठिकाणी हिंदूंच्या प्रार्थनास्थळांनाही लक्ष्य करण्यात आले.  या घटनांविरोधात अमरावतीमध्ये सकल हिंदू समाजातर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.  ज्यात हिंदुत्ववादी पक्ष व सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.

काय म्हणाले नेभनानी?

बांगलादेशात हिंदू समाजासोबत जे काही घडत आहे ते आपण पाहात आहोत. नरेंद्र मोदी हे एक कर्मठ माणूस आहेत आणि या विरोधात ते काहीतरी कारवाई करतील असा आम्हाला विश्वास आहे. राज्यातही ज्या काही घटना घडल्या आहेत त्या अत्यंत दुर्दैवी आहेत. मुख्यमंत्रीसाहेब त्याची दखल घेत आहेत. यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. मी आणि मुख्यमंत्री शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो की, त्यांनी महिलांना  रिव्हॉल्व्हर वापरण्याची परवानगी द्यावी. विशेषकरून त्यांनी जर ही परवानगी दिली तर अमरावतीत मी स्वतः महिलांना माझ्यातर्फे रिव्हॉल्व्हर घेऊन देईन. महिलांनी स्वसंरक्षणासाठी आता  रिव्हॉल्व्हर  वापरावी. यात दोन-चार माणसे मेली तरी हरकत नाही पण वाईट लोक आता जिवंत राहायला नकोत. याची जबाबदारी मी घेईन, कोर्ट-कचेरीचा खर्चही मी करायला तयार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest