‘ऑर्गनायझर’ नंतर ‘विवेक’ मध्येही पराभवाचे खापर अजितदादांवर

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाची मोठी पिछेहाट झाल्याचे खापर अजितपदादा पवार यांच्याबरोबरच्या संबंधावर फोडले जात आहे. निकालानंतर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर या मुखपत्रातून अजित पवार यांच्या राजकीय उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यानंतर संघाशी संबंधित विवेक या मराठी साप्ताहिकानेही अजित पवारांना महायुतीत घेतल्याबद्दल तीव्र आक्षेप नोंदविले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 18 Jul 2024
  • 11:33 am
political news, Lok Sabha elections, Ajitadada Pawar, political usefulness, maharastra

संग्रहित छायाचित्र

political news, Lok Sabha elections, Ajitadada Pawar, political usefulness, maharastra

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाची मोठी पिछेहाट झाल्याचे खापर अजितपदादा पवार यांच्याबरोबरच्या संबंधावर फोडले जात आहे. निकालानंतर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित  ऑर्गनायझर या मुखपत्रातून अजित पवार यांच्या राजकीय उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यानंतर संघाशी संबंधित विवेक या मराठी साप्ताहिकानेही अजित पवारांना महायुतीत घेतल्याबद्दल तीव्र आक्षेप नोंदविले आहेत.

‘कार्यकर्ता खचलेला नाही, तर संभ्रमात’ शिर्षकाच्या लेखात ‘विवेक’ने लोकसभा निकालाची चिरफाड केली आहे. “लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना वा आपली नाराजी, अस्वस्थता सांगताना प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेल्या युतीपासून सुरूवात करतो. राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे. याची जाणीव भाजपा नेत्यांनाही आहे, असा नाराजीचा सूर लेखात आहे.

शरद पवार गटाचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित मुखपत्राने दुसऱ्यांदा अजित पवार यांच्याविरोधात भाष्य केले आहे. याचाच अर्थ भाजपाला आता अजित पवार किंवा त्यांचा गट नकोसा झाला आहे. भाजपा फक्त दुसऱ्यांचे पक्ष आणि कुटुंब फोडते. त्यातून काही प्रमाणात मतांचा लाभ मिळविण्याचा प्रयत्न असतो. लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रातील जनतेने या राजकारणाला फाटा दिला. खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष कोणता, हे लोकांनी दाखवून दिले आहे.

अजित पवारांना बरोबर घेऊन फायदा तर काहीच नाही, उलट नुकसानच अधिक झाले, याची प्रचिती लोकसभेच्या निकालानंतर आता भाजपाला आली असावी. त्यामुळे भविष्यात त्यांना अशा लोकांना एकत्र घ्यायचे नसेल. पण भाजपाच नाही तर अजित पवार गटातील लोकांनाही आता या गटाबाबत साशंकता वाटत आहे. अजित पवारांच्या बारामतीमध्येच त्यांच्या उमेदवारांना लीड मिळू शकलेला नाही. याचाही विचार भाजपाने केला असेल.

शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ऑर्गनायझर नंतर आता साप्ताहिक विवेकने अजित पवारांच्या विरोधात लेख लिहिला आहे. त्यामुळे भाजपा आणि अजित पवार यांच्यात नेमके काय चालले आहे? याबाबत मी काही ठामपणे सांगू शकत नाही. याबद्दल ते दोन पक्ष बोलू शकतात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest