कराडच्या आश्रमात चालतेय देहविक्री, गतिमंद मुलींकडून मालिश करून घेतल्याचा व्हीडीओ व्हायरल

सातारा : राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. चिमुकल्या मुलीही नराधमांच्या वासनेचा शिकार होताहेत. बदलापूरच्या घटनेनंतर तर शाळेतील मुलीही सुरक्षित नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आता अशीच एक धक्कादायक साताऱ्यातील कराडमधून समोर आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 23 Aug 2024
  • 10:21 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सातारा : राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.  चिमुकल्या मुलीही नराधमांच्या वासनेचा शिकार होताहेत. बदलापूरच्या घटनेनंतर तर शाळेतील मुलीही सुरक्षित नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आता अशीच एक धक्कादायक साताऱ्यातील कराडमधून समोर आली आहे. कराडच्या टेंभू इथल्या निराधार आश्रमात अनाथ मुली आणि महिलांना मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. या आश्रम शाळेच्या संचालिका गतिमंद मुलांकडून मालिश करून घेत असल्याचा व्हीडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  एका पीडित महिलेच्या तक्रारीनंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला असून  या प्रकरणी पोलिसांनी आश्रमशाळेच्या संचालिका आणि तिच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कराडच्या निराधार आश्रमात जबरदस्तीने देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचा आरोपही तक्रारदार महिलेने केला आहे. गतिमंद मुलींचे देखील हाल सुरू असल्याचे समोर आले आहे. सातारा - सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली कराड टेंभू इथल्या आश्रमामध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. अनाथ मुली आणि महिलांना या आश्रमात आश्रय दिला जातो आणि त्यानंतर त्यांना मानसिक त्रास आणि अश्लील वर्तणूक करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप एका महिलेने केलेला आहे. या आश्रमामध्ये गतिमंद मुलीकडून आश्रम चालक महिला पायाला मॉलिश करून घेतानाचा आणि मारहाण करतानाचा व्हीडीओही समोर आला आहे. एवढेच नव्हे तर आश्रम चालक महिलेच्या स्वयंपाकघरामध्ये चक्क दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. यात एक मुलगी पाण्याच्या हंड्यातून दारूच्या बॉटल घेऊन त्या बरणीमध्ये ठेवत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी कराड पोलिसांनी 'आई चॅरिटेबल ट्रस्ट निराधार आश्रमा'च्या संचालिका आणि त्यांच्या एका सहकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ

अकोला जिल्ह्यातही शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे.  जिल्ह्यातील काझीखेडा जिल्हा परिषदेच्या शाळेतील ६ विद्यार्थिनींवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केला. विद्यार्थिनींना अश्लील व्हीडीओ दाखवून हा शिक्षक मुलींवर अत्याचार करायचा. या नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकाचे निलंबन करण्यात आले. तर पुण्यात मुलींवरील अत्याचाराच्या दोन घटना समोर आल्या आहेत. १५ ऑगस्टला  भवानी पेठ परिसरातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे.  या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून एका १९ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर चौघा नराधमांनी अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्यात तर दोघांचा शोध सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest