संग्रहित छायाचित्र
२०२४ हे वर्ष तुम्हाला उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, व्यायाम न करणे आणि मोबाइलवर रील्स पाहण्यात गेले असेल. तर आता यातील सर्व वाईट सवयी सोडून येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या सवयींनी करा. २०२५ या वर्षात काही नवीन सवयी आपण लावून घेऊ शकतो. तसेच काही नवीन वर्षाचे संकल्प देखील आपण करू शकतो. आम्ही तुम्हाला अशा १० गोष्टी सुचवत आहोत. या गोष्टींना तम्ही तुमच्या नवीन वर्षाच्या संकल्पात स्थान देवू शकता.
१) रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे. पुरेशी विश्रांती घेतल्याने आपल्याला सतर्कता जाणवते. आपली एकाग्रता आणि कार्यक्षमता वाढते.
२) पुरेसे पाणी प्या. सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी प्या. आपले शरीर हायड्रेट ठेवा. त्यामुळे आपले चयापचय सुधारते.
३) व्यायाम करणे. सकाळी व्यायाम करण्याची सवय येणाऱ्या वर्षात आपण लावून घेऊ शकतो. त्यामुळे दिवसभराच्या कामासाठी आपल्याला ऊर्जा मिळेल.
४) सकाळी पौष्टिक नाश्ता करणे. सकाळच्या नाश्यामुळे आपल्याला आवश्यक ऊर्जा मिळेल. दिवसभराच्या कामासाठी आपली शक्ती टिकून राहील.
५) ध्यानाचा सराव करणे. ध्यान करण्याची सवय आपल्याला तणाव कमी करण्यास आणि मानसिक स्पष्टता सुधारण्यास उपयोगी ठरू शकते.
६) दिवसभराचे नियोजन करा. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. तसेच वेळेचे व्यवस्थापन करा. त्यामुळे दिवसभरात तुम्ही भरपूर कामे उरकू शकता. तसेच दिवसभरातील सर्वात महत्त्वाचे काम आधी संपवा
७) स्क्रीन वेळ मर्यादित करा. मोबाइल किंवा टीव्हीवर वेळ वाया घालवणे कमी करा. रील्स बघण्यात वेळ वाया घालवू नका.
८) वाचन करा. मोबाइलवरील वेळ आपण वाचनासाठी देवू शकतो. येणाऱ्या वर्षात महिन्यात किमान एक अशी १२ पुस्तके वाचण्याचा संकल्प आपण करू शकतो.
९) आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा. आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत या वर्षी नवीन ठिकाणी फिरायला जा.
१०) नवीन गोष्ट शिका. स्वत:ला अपडेट ठेवण्यासाठी कोणतेही एक नवीन कौशल्य या वर्षी शिकण्याचा संकल्प आपण आपल्या नवीन वर्षाच्या संकल्पात करू शकतो.