Benefits of Walnuts : थंडीत अक्रोड खा अन् रहा निरोगी; आहेत जबरदस्त फायदे

आपला फिटनेस जपण्यासाठी अनेकजण अनेक प्रयत्न करत असतात. बदलत्या ऋतूप्रमाणे काहीजण आपल्या आहारातदेखील बदल करत असतात. तर हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी अनेकजण सुका मेवाचा समावेश आहारात करतात. विशेष म्हणजे अक्रोड हे निरोगी आरोग्यासाठी खुप गुणकारी आहे. विशेष म्हणजे हिवाळ्यात सर्वांनी आपल्या आहारात अक्रोडचा समावेश करणं गरजेचं आहे, असे अनेक तज्ज्ञ सांगतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 24 Dec 2024
  • 01:23 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News, Benefits of Walnuts, Walnuts , health, Winter Diet, अक्रोड खाण्याचे फायदे, अक्रोडचे सेवन कसं करावे, आरोग्य, फिटनेस

आपला फिटनेस जपण्यासाठी अनेकजण अनेक प्रयत्न करत असतात. बदलत्या ऋतूप्रमाणे काहीजण आपल्या आहारातदेखील बदल करत असतात. तर हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी अनेकजण सुका मेवाचा समावेश आहारात करतात. विशेष म्हणजे अक्रोड हे निरोगी आरोग्यासाठी खुप गुणकारी आहे. विशेष म्हणजे हिवाळ्यात सर्वांनी आपल्या आहारात अक्रोडचा समावेश करणं गरजेचं आहे, असे अनेक तज्ज्ञ सांगतात.

अक्रोडमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर व हेल्दी फॅट्स यांसारखे अनेक पोषक घटक असतात. शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी आणि अंतर्गत शक्ती वाढवण्यासाठी अक्रोडाचे सेवन करणे हा एक उत्तम मार्ग आहे. अक्रोडचे सेवन हिवाळ्यात केल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. याच्या सेवनाने  कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून बचाव होतो.

आहारतज्ज्ञ परमीत कौर यांच्या मते, हिवाळ्याच्या काळात आहारात बदल करणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये हंगामी भाज्यांसह सुका मेवाही खाण्यास सुरुवात करायला हवं. उष्ण असलेले अक्रोड हे थंडीपासून संरक्षण करण्यास मदत करते. चला जाणून घेऊयात अक्रोड खाण्याचे फायदे...

अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असते. अक्रोडाचे सेवन कॅल्शियम आणि लोह पुरवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. त्यात कार्बोहायड्रेट, फायबर, सॅच्युरेटेड फॅट, असंतृप्त चरबी, प्रथिने आणि मॅग्नेशियम तसेच फॉस्फरस यांसारखे अनेक पोषक घटक देखील असतात.

हाडे मजबूत होतात

थंडीमध्ये सूज येणे, सांधे दुखणे यांसारख्या समस्या वाढतात. अनेकांना हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास जाणवत असतो. अशा परिस्थितीत अक्रोडचे सेवन करणे फायदेशीर ठरते. अक्रोडचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात आणि ज्यांची हाडे आणि सांधे दुखतात त्यांना मदत होते. त्यांनी या ड्रायफ्रूटचा आहारात समावेश जरूर करावा. अक्रोडातील कॅल्शियममुळे हाडे निरोगी राहण्यास मदत होते.

 

निरोगी हृदयासाठी अक्रोडचे सेवन फायदेशीर

अक्रोडमध्ये आढळणारे ओमेगा 3 फॅटी ऍसिड शरीरात रक्त गोठण्यास प्रतिबंध करते, म्हणजे रक्ताच्या गुठळ्या कमी तयार होतात आणि ते हृदय निरोगी ठेवण्यास देखील मदत करते. थंडीच्या महिन्यात रक्तदाब वाढण्याची समस्या अधिक दिसून येते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अक्रोडाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. हे ड्राय फ्रूट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

 

थंडीत अक्रोडचे सेवन कसं करावे

हिवाळ्यात अक्रोडचे सेवन योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे.  2-3 अक्रोड रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल आणि त्यात असलेले पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषले जातील. 

हे न भिजवताही खाता येतात. जेव्हा तुम्हाला थोडी भूक लागते तेव्हा तुम्ही स्नॅक म्हणून अक्रोडाचे सेवन करू शकता, यामुळे तुम्हाला दीर्घकाळ उत्साही वाटेल. यासोबत तुम्ही इतर ड्राय फ्रूट्सही खाऊ शकता. अक्रोड सॅलड आणि चटणीच्या स्वरूपातही खाऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी अक्रोडाची पेस्ट दुधात मिसळून प्यायल्याने शरीर उबदार राहते आणि त्वरित ऊर्जा मिळते.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest