संग्रहित छायाचित्र
१ जानेवारीला एक संपूर्ण पिढीच बदलणार आहे. म्हणजेच एका नव्या जनरेशनची सुरुवात १ जानेवारी २०२५ ला होणार आहे.
विसाव्या आणि एकविसाव्या शतकात जन्मलेल्या लोकांचे अनुभव, त्यांची मूल्यं, त्यांच्यावरील सांस्कृतिक प्रभाव, इत्यादी गोष्टींच्या आधारे वेगवेगळ्या पिढ्यांचं वर्गीकरण केलं गेलं आहे. आतापर्यंत अशा एकूण ७ पिढ्या होवून गेल्या. आणि एक जानेवारीला एका नव्या पिढीची सुरुवात होणार आहे. जनरेशन बीटा असं या पिढीचं नाव असणार आहे.
१९०१ ते १९२७ या काळातील पिढीला द ग्रेटेस्ट जनरेशन असं म्हटलं जातं. तर १९२८-१९४५ या काळातील लोकांचं वर्गीकरण द सायलेंट जनरेशन असं केलं जातं. १९४६ ते १९६४ या काळात बेबी बूम जनरेशन होवून गेली. तर १९६५ ते १९८० या काळातील लोकांना जनरेशन एक्सचे लोक म्हटलं गेलं.
१९८१ ते १९९६ या काळात जन्मलेल्या लोकांना जनरेशन वाय असं म्हटलं जातं. याच लोकांना मिलेनियल्स असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर आलेली पिढी ही जनरेशन जेड म्हणजेच ज्येन झी ही आहे. १९९७ ते २०१० या काळात जन्मलेल्या तरुण-तरुणींचं वर्गीकरण ज्येन झी असं करण्यात आलं आहे. सर्वाधिक चर्चेत राहिलेली पिढी हे ज्येन झी चं वैशिष्ट्य. तर २०११ ते २०२४ या काळातील मुलंमुली ही जनरेशन अल्फाची मानली जातात.
आता १ जानेवारी २०२५ नंतर जन्माला येणारी बाळं ही जनरेशन बीटाची असल्याचं मानलं जाणार आहे. थोडक्यात काय तर एक संपूर्ण पिढीच १ जानेवारीला बदलणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.