संग्रहित छायाचित्र
टेक्नॉलॉजीच्या नव्या युगात एक मोठं पाऊल ठेवत, OpenAI चा लोकप्रिय बॉट ChatGPT आता व्हाट्सअॅपवर उपलब्ध झाला आहे. यामुळे यूझर्सना त्यांच्या मोबाइल फोनवर व्हाट्सअॅपच्या माध्यमातून थेट ChatGPT सोबत संवाद साधता येणार आहे.
हे खूप सोप्पं आहे. तुम्हाला फक्त +11-800-242-8478 हा नंबर तुमच्या मोबाइलमध्ये सेव्ह करावा लागेल. त्यानंतर व्हाट्सअॅप ओपन करून या नंबरसोबत चॅट सुरू करा. यानंतर तुम्ही तुमचे सर्व प्रश्न ChatGPT ला विचारू शकता. तुमच्या शंकेचे निरसन होईल, नवं ज्ञान मिळवता येईल, किंवा कोणत्याही विषयावर सल्ला घेता येईल.
या नव्या फिचरमुळे व्हाट्सअॅप वापरणाऱ्या लोकांना अधिक सहजतेने आणि सोप्या पद्धतीने ChatGPT चा अनुभव घेता येईल. जसे तुम्ही तुमच्या मित्रांशी संवाद साधता, तसेच ChatGPT तुमच्याशी संवाद साधेल.
तंत्रज्ञानाच्या या नव्या सुविधेमुळे अधिक लोकांना ChatGPT चा उपयोग करण्याची संधी मिळणार असून, हे एक मोठं परिवर्तन आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.