संग्रहित छायाचित्र
हिवाळा सुरु झाला की, प्रत्येकजण आपापल्या त्वचेची काळजी घेत असतो. कोरड्या पडणाऱ्या त्वचेचा त्रास अनेकांना भेडसावत असतो. अनेकांच्या त्वचेवर रॅशेस उठणे, खाज सुटणे अशा विविध समस्या निर्माण होत असतात. विशेष म्हणजे थंडीत टाचांना भेगा पडणे आणि त्यातुन रक्त येणे ही समस्या बहुतांश जणांना जाणवत असते. विशेषतः महिलांना.
थंडी सुरु झाली की टाचांना भेगा पडण्याची समस्या अधिक जाणवू लागते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काहीजण विविध ब्रॅन्डचे महागड्या क्रिम्सचा वापर करतात. मात्र, या महागड्या क्रिम्सचा परिणाम हा काही कालावधीपुर्ताच होतो. याचा अनुभव अनेकांना आला असेल. तर आज आम्ही तुम्हाला या समस्येपासून मुक्त करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.
कोरफडीचा गर
रुक्ष झालेल्या टाचांना कोरफडीचा गर लावण्यापूर्वी कोमट पाण्याने पाय धुवा. त्यानंतर पायाला बाजारातून आणलेला किंवा तुमच्या बागेतील ताजा कोरफडीचा गर तुमच्या टाचांना लावा. गर सुकल्यानंतर सॉक्स घालून झोपावं. यामुळे रात्रभर टाचा मऊ होण्यास मदत होते.
खोबरेल तेल
खोबरेल तेलाला बहुगुणी म्हणुन ओळखले जाते. हे तेल भेगा पडलेल्या टाचांसाठी खुप उपयुक्त आहे. भेगा पडलेल्या टाचांवर रात्री झोपताना खोबरेल तेल लावा आणि सॉक्स घाला. असे काही दिवस करा तुम्हाला फरक जाणवेल.
मध
मध जखमा बरे करण्यामध्ये आणि स्वच्छ करण्यात मदत करते. हे त्वचेला नेहमी मॉइश्चरायझिंग ठेवते. ण्यात पाय भिजवल्यानंतर तुम्ही फूट स्क्रब म्हणून मध वापरू शकता किंवा रात्रभर फूट मास्क म्हणून लावू शकता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.