Manmohan Singh died due to THIS dangerous disease know causes symptoms and more
भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मनमोहन सिंह रेस्पिरेटरी डिसीजने त्रस्त होते. या आजारामुळं त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असे. तर आज जाणून घेऊयात या आजाराबद्दल.
हा आजार नेमका आहे तरी काय?
रेस्पिरेटरी डिसीज हा आजार धोकादायक आहे. मराठी मध्ये या रोगाला श्वसन रोग असं म्हटलं जाते. तज्ज्ञाच्या माहितीनुसार, हा आजार संसर्ग, वायू प्रदूषण, धुम्रपान, सेकंड हँड स्मोकिंग, इनहेलिंग रेडॉन किंवा एस्बेस्टोस धुळीमुळे होऊ शकतो.
श्वसनाच्या या समस्येमध्ये दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), पल्मोनरी फायब्रोसिस, न्यूमोनिया आणि फुफ्फुसाचा कॅन्सर यांचा समावेश होतो. याला फुफ्फुसाचा विकार आणि फुफ्फुसाचा आजार असंही म्हटलं जातं.
श्वसनाच्या या समस्येमध्ये दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), पल्मोनरी फायब्रोसिस, न्यूमोनिया आणि फुफ्फुसाचा कॅन्सर यांचा समावेश होतो. याला फुफ्फुसाचा विकार आणि फुफ्फुसाचा आजार असंही म्हटलं जातं.
बदलत्या जीवनशैलीमुळं श्वसनाच्या आजारांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरत आहे. वातावरणामुळे श्वसनाच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज आणि अस्थमामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
हा आजार टाळण्यासाठी
श्वासोच्छवासाच्या आजारांना बळी पडू नये असे वाटत असेल तर धूम्रपानासारख्या वाईट सवयी सोडून द्याव्यात.
फुफ्फुसांचे नुकसान करणारे वायू प्रदूषण टाळण्यासाठी तुम्ही मास्क वापरू शकता. या प्रकारचा रोग टाळण्यासाठी, आपण घरामध्ये एअर प्युरिफायर किंवा झाडं लावू शकता.
याशिवाय व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटने भरपूर आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा जेणेकरून तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहील.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.