Dr. Sanjay Marsale : येरवडा कारागृहाच्या रुग्णालयातील डॉ. संजय मरसाळे याला अटक

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये (Lalit Patil Drug Case) येरवडा कारागृहाच्या रुग्णालयाच्या डॉ. संजय मरसाळे (Dr. Sanjay Marsale) याला गुन्हे शाखेच्या युनिट (Crime Branch) दोनच्या पथकाने अटक केली आहे.

Dr. Sanjay Marsale

येरवडा कारागृहाच्या रुग्णालयातील डॉ. संजय मरसाळे याला अटक

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कारागृहाचे आणखी एक कनेक्शन आले पुढे

पुणे : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये (Lalit Patil Drug Case) येरवडा कारागृहाच्या रुग्णालयाच्या (Yerwada Jail) डॉ. संजय काशिनाथ मरसाळे, वैद्यकीय अधिकारी येरवडा कारागृह (Dr. Sanjay Marsale) याला गुन्हे शाखेच्या युनिट (Crime Branch)  दोनच्या पथकाने अटक केली आहे. पहाटे चार वाजल्यापासून पोलीस सापळा लावून तयार होते. वानवडी येथील मोहम्मद वाडी रस्त्यावर असलेल्या त्याच्या घरामधूनच मरसाळे याला उचलण्यात आले. मागील तीन दिवसापासून त्याचा शोध सुरू होता. डॉ. मरसाळे यानेच ललितला ससून रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केलेली होती.

ललित पाटील ट्रक प्रकरणामध्ये येरवडा कारागृहातील रुग्णालयाच्या अधिकाऱ्याला अटक होणार अशी चर्चा पोलीस होती. पोलीस ससून रुग्णालयातील आणखी दोन जणांचा या प्रकरणामध्ये शोध घेतला जात आहे. त्यांना देखील लवकरच अटक केली जाणार आहे. दरम्यान, येरवडा कारागृहातील रुग्णालयातून झालेली ही दुसरी अटक आहे. यापूर्वी येरवडा कारागृहातील रुग्णालयाच्या समुपदेशक असलेल्या सुधाकर इंगळे याला गुन्हे शाखेने अटक केली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ससून रुग्णालयातील शिपाई महेंद्र शेवते याच्या अटकेनंतर सुधाकर इंगळे याचे नाव समोर आले होते. त्याच्याकडे झालेल्या चौकशीमध्ये डॉ. मरसाळे याचे नाव समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी तीन दिवसापासून त्याचा शोध सुरू केलेला होता. परंतु, तो पोलिसांना मिळून येत नव्हता. दरम्यान, तो वानवडी येथील घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पहाटे चार वाजल्यापासून या ठिकाणी सापळा लावला आणि त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याला न्यायालयामध्ये आज हजर केले जाणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest