पुण्यात महिला पोलिसही असुरक्षित! पोलिस कर्मचाऱ्याने महिला पोलिस कर्मचाऱ्यावर गुंगीचे औषध देऊन केले 'अत्याचार'

पुणे शहरात महिला सुरक्षीततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे चित्र आहे. काल पुण्यात एका नराधाम बापाने आपल्याच लेकीसोबत अश्लील चाळे केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एका पोलिस शिपायाने महिला पोलिसाला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Tue, 5 Sep 2023
  • 12:14 pm
Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात महिला पोलिसही असुरक्षित! पोलिस कर्मचाऱ्याने महिला पोलिस कर्मचाऱ्यावर गुंगीचे औषध देऊन केले 'अत्याचार'

पुणे शहरात महिला सुरक्षीततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे चित्र आहे. काल पुण्यात एका नराधाम बापाने आपल्याच लेकीसोबत अश्लील चाळे केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एका पोलिस शिपायाने महिला पोलिसाला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची अश्लील चित्रफित तयार करत ती व्हायरल करण्याची धमकी देत पतीला घटस्फोट देण्यास भाग पाडत तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबध निर्माण केले. तसेच पिस्तूलाचा धाक दाखवत तिच्याकडील दागिनेही पळविले. या घटनेनंतर पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. 

याप्रकरणी पीडित महिला कर्मचाऱ्याने शहरातील खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी दीपक सिताराम मोघे या पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि फिर्यादी हे दोघेही पुणे शहर पोलिस दलातील एका पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे. हा प्रकार पोलीस वसाहत तसेच खडकवासला येथील लॉजवर २०२० ते १ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कर्मचारी आणि आरोपी हे दोघेही पुणे शहर पोलिस दलातील एका पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे. आरोपी दिपक याने सुरुवातीला लॉकडाऊनच्या काळात पीडितेशी ओळख वाढवली. त्यानंतर पीडितेला त्याच्या घरी जेवणासाठी बोलावले तेव्हा त्याने शितपेयातून फिर्यादीला गुंगीचे औषध दिले आणि फिर्यादीसोबत शारीरिक संबध केले तसेच या संपुर्ण प्रकरणाची व्हिडिओ चित्रफीत तयार केली. दरम्यान हा सर्व प्रकार फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत आरोपी दिपक यास विचारण केली तेव्हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याचबरोबर पतीला जीवे मारण्याची धमकी देत घटस्फोट देण्यास भाग पाडत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार संबंध ठेवले. याशिवाय पिस्तूलाचा धाक दाखवून घरातील कपाटातील ५ ते ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, डोंगल व मोबाईल अशा सर्व वस्तू जबरदस्तीने घेऊन गेला. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने आरोपी विरोधात पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिस करत आहेत. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest