Pune Crime News : पोलिसांकडून मारहाणीची महिलेची तक्रार; सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police) दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीच्या पत्नीने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadpsar Police)गुन्हा दाखल करून तो मुंढवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या पत्नीने केला आरोप

पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police) दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीच्या पत्नीने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadpsar Police)गुन्हा दाखल करून तो मुंढवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. (Pune Crime News)

सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे, (Sameer Karpe) पोलीस उपनिरीक्षक धनंजय गाडे,(Dhananjay Gade) पोलीस कर्मचारी वैशाली बनकर  (Vaishali Bankar)यांच्या विरोधात कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश डेरे नावाच्या आरोपी विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी डेरे फरार आहे. त्याच्या चौकशीसाठी कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात आलेले होते. त्यावेळी त्याच्या पत्नीने आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार सुरू केली होती. या महिलेने अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन तक्रार केली. शर्मा यांनी या प्रकरणाची चौकशी हडपसर पोलिसांकडे दिली होती. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल करून तो मुंढवा पोलिसांकडे वर्ग केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest