Pune Crime News : तोतया 'कपिल शर्मा' कडून महिलेचा विनयभंग; दहा वेळा फोन करून केली अश्लील टिपणी

एका महिलेला वारंवार मोबाईलवरून संपर्क साधून आपण कपिल शर्मा (Kapil Sharma) बोलत असल्याची बतावणी करीत तिचा विनयभंग (molestation) करण्यात आला. तसेच, या महिलेच्या पतीने जाब विचारताच तिच्याबद्दल अश्लील टिप्पणी करण्यात आली.

तोतया 'कपिल शर्मा' कडून महिलेचा विनयभंग; दहा वेळा फोन करून केली अश्लील टिपणी

पुणे : एका महिलेला वारंवार मोबाईलवरून संपर्क साधून आपण कपिल शर्मा (Fake Kapil Sharma) बोलत असल्याची बतावणी करीत तिचा विनयभंग (molestation) करण्यात आला. तसेच, या महिलेच्या पतीने जाब विचारताच तिच्याबद्दल अश्लील टिप्पणी करण्यात आली. हा प्रकार बुधवारी पावणे बारा ते दुपारी एक या कालावधी दरम्यान कल्याणी नगर येथे घडला. याप्रकरणी येरवडा पोलीस (Yerwada Police)  ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

कपिल शर्मा नाव सांगणाऱ्या अनोळखी मोबाईल क्रमांक धारकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला कल्याणी नगर येथील एका आलिशान सोसायटीमध्ये राहण्यास आहे. ही महिला तिच्या कार्यालयामध्ये असताना आरोपीने तिला मोबाईलवर दहा वेळा फोन केला. 'मै कपिल शर्मा बात कर रहा हू। पहचाना नही क्या? उस दिन तो नाईट को ऑयो हॉटेल मे मिले थे। दीपक है क्या?' असे बोलून तिचा विनयभंग केला.

त्यानंतर तिने पतीला फोन करून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. तिच्या पतीने आरोपीला याबाबत फोन करून जाब विचारला. त्यावेळी त्याने 'तेरी वाइफ ओयो मे जाती है। गलत काम करती है। उसको देखो।' असे बोलून त्यांना देखील आई बहिणी वरून घाणेरड्या शिव्या दिल्या. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest