'स्विगी'च्या डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा 'विनयभंग', पुण्यातील धक्कादायक प्रकार

'स्विगी' ॲप वरून घरगुती साहित्याची ऑर्डर दिलेल्या तरुणीचा डिलिव्हरी बॉयने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. डिलिव्हरी बॉयने या तरुणीला 'तुम सेक्स करोगी क्या?' असे विचारत अश्लील हावभाव करून या महिलेसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Wed, 6 Sep 2023
  • 09:57 am
Swiggy delivery boy molested

'स्विगी'च्या डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा 'विनयभंग'

पुणे : 'स्विगी' ॲप वरून घरगुती साहित्याची ऑर्डर दिलेल्या तरुणीचा डिलिव्हरी बॉयने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. डिलिव्हरी बॉयने या तरुणीला 'तुम सेक्स करोगी क्या?' असे विचारत अश्लील हावभाव करून या महिलेसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास वाकडेवाडी येथे घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी स्विगीच्या डिलिव्हरी बॉय विरोधात भादवी ३५४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी २६ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने 'स्विगी'वरून त्यांच्या घरगुती साहित्याची ऑर्डर केलेली होती. हे सामान तपासात असताना त्यामधील सॅनिटरी पॅडचे पॅकिंग फोडलेले दिसले. या तरुणीने 'स्विगी'ला त्यांच्या मोबाईलवरून फाटलेल्या सॅनिटरी पॅडचा फोटो पाठवला आणि नवीन पॅकेट पाठवावे असे सांगितले. त्यानुसार 'स्विगी'ने नवीन डिलिव्हरी बॉयला सॅनिटरी पॅड घेऊन या तरुणीच्या पत्त्यावर पाठवले. 

डिलिव्हरी बॉयने या तरुणीकडे पॅकेट दिल्यानंतर पैशांबाबत विचारणा केली. त्यावेळी तिने त्याला 'स्विगी' सोबत बोलून घेण्यासंदर्भात सांगितले. त्यावर आरोपीने 'तुम मुझसे सेक्स करोगी' असे म्हणत तिचा विनयभंग केला. अश्लील हावभाव करून तिच्या घरात फोन चार्जिंगच्या निमित्ताने जाऊन विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest