Pune Crime News : चोरटे स्पीडगन लांबवतात तेव्हा...

मुंबई-बंगळुरू महामार्गावर सतत होणारे अपघात रोखण्यासाठी वेग दर्शवणारे कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, महामार्गावर उपाययोजना म्हणून लावलेल्या स्पीडगन चोरट्यांनी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विशाल विष्णू वायकर यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Mon, 25 Sep 2023
  • 11:19 am
Pune Crime News

चोरटे स्पीडगन लांबवतात तेव्हा...

मुंबई-बंगळुरू महामार्गावर अपघात कमी करण्याच्या उद्देशाने भूमकर चौकात मार्चमध्ये बसवले होते उपकरण

नितीन गांगर्डे

मुंबई-बंगळुरू महामार्गावर सतत होणारे अपघात रोखण्यासाठी वेग दर्शवणारे कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, महामार्गावर उपाययोजना म्हणून लावलेल्या स्पीडगन चोरट्यांनी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विशाल विष्णू वायकर यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

फिर्यादी वायकर (वय २७, रा. शाहुनगर, चिंचवड) हे "सेव्ह लाईफ फाऊंडेशन" या चिंचवडमधील एनजीओमध्ये सीनिअर असोसिएट क्रॅश इनव्हेस्टीगेशन ॲन्ड प्रिव्हेंन्शन या पदावर कार्य करतात. मागील दीड वर्षांपासून ते हे काम करत असून त्यांच्या कामाचे स्वरूप हे महामार्गावरील वाढते अपघात कशा पद्धतीने टाळता येतील, त्यावर उपाय काय आहे, अपघात होऊ नये यासाठीच्या उपाययोजना सुचवत असतात.

मुंबई-बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले ब्रीजजवळ अनेकदा अपघात होत आहेत. या परिसरात शेकडो अपघात झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सेव्ह लाईफ फाऊंडेशनने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्याशी पत्र व्यवहार केला. त्याद्वारे महामार्गावर भूमकर चौकाच्या पुढे सेल्फी पॉईंटजवळ स्पीड गन आणि व्हेईकल ॲक्चुएटेड स्पीड साईन हे उपकरण (VAAS) बसविण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव प्राधिकरणाने मंजूर केल्यावर  १३ मार्च २०२३ रोजी अँडॉर कंपनीची स्पीड गन आणि उपकरण महामार्गावरील दुभाजकावर भूमकर सेल्फी पॉईंटजवळ बसविले होते. हे उपकरण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना सावकाश जा असा संदेश दाखवत होते. 

जाणाऱ्या वाहनाचा वेगही त्यावर नोंदवला जात होता. स्पीडगन आणि उपकरणाची देखरेख आणि दुरुस्ती हे फिर्यादी पाहात होते. शुक्रवार, २२ सप्टेंबर रोजी तपासणीत स्पीडगन आणि उपकरण जागेवर नसल्याचे आढळले. त्यामुळे वायकर यांनी स्पीडगन चोरीस गेल्याची तक्रार दिली. चोरीला गेलेल्या साहित्याची किंमत २ लाख रुपये आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी पोलीस अंमलदार भोसले यांनी सांगितले.   

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest