विनय अर्हाना आणि अ‍ॅड. सागर सूर्यवंशीला अटक

पुणे : पिंपरी चिंचवडच्या सेवा विकास सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रोझरी एज्युकेशन ग्रुपचा संचालक विनय अर्हाना आणि अ‍ॅड. सागर सूर्यवंशी या दोघांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडून अटक करण्यात आली आहे.

फोटो अनुक्रमे: विनय अर्हाना आणि अ‍ॅड. सागर सूर्यवंशी

सीआयडीकडून सेवा विकास सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी कारवाई

पुणे : पिंपरी चिंचवडच्या सेवा विकास सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी (Seva Development Cooperative Bank Scams) रोझरी एज्युकेशन ग्रुपचा संचालक विनय अर्हाना (Vinay Arhana) आणि अ‍ॅड. सागर सूर्यवंशी (Sagar Suryavanshi) या दोघांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडून अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी करून सीआयडीने गुरुवारी रात्री उशिरा अर्हानाचा ताबा घेतला. त्यानंतर एड. सूर्यवंशी आणि आराना या दोघांना रात्री साडेबारा वाजता विशेष न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. या दोघांना न्यायालयाने सीआयडी पोलीस कस्टडी सुनावली आहे. शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री साडेबारा वाजता मध्यरात्री सुनावणी झाली आहे.

सेवा विकास बॅंकेमध्ये ४२९ कोटीचा घोटाळा बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आला होता. खोट्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मंजूर करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच अपहार करण्यात आल्याचे देखील समोर आले होते. या प्रकरणी पिंपरी चिंचवड मधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यासह काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.  त्यावेळी अमर मुलचंदानी यांना अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आलं होतं. मूलचंदानी हे पिंपरी - चिंचवडचे माजी नगरसेवक आहेत. दरम्यान, ईडीने बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी, संचालक/अधिकारी आणि कर्ज थकबाकीदारांविरुद्ध पुण्यात नोंदवलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे तपास सुरू केला होता.

जुलै २०२३ मध्ये मूलचंदानी यांना  ईडीकडून अटक करण्यात आली होती. मुलचंदानी यांच्या विविध बेनामी संपत्तीसह या प्रकरणात यापूर्वी १२२.३५ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली होती. तब्बल १२४ एनपीए कर्ज खात्यांमुळे बँकेचे ४२९ कोटी रुपयांचे नुकसान झाले. यामुळे बँक दिवाळखोरीत निघाली.  हजारो लहान ठेवीदारांचे नुकसान झाले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest