Suicide News : सावकारी कर्जाने घेतला बळी; ५१ वर्षीय व्यक्तीने घेतला गळफास

सावकारी कर्जाला कंटाळून ५१ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) १८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सावकारी कर्जाने घेतला बळी; ५१ वर्षीय व्यक्तीने घेतला गळफास

पुणे : सावकारी कर्जाला कंटाळून ५१ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) १८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१६ ते १५ नोव्हेंबर २०२३ या कालावधी दरम्यान केशवनगर येथील साईसृष्टी बिल्डिंग या ठिकाणी घडला. (Pune Crime News)

राम परशुराम भोसले (Ram Bhosale) (वय ५१) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राजेश, राज तावदान, त्याची पत्नी, सिद्धू मंगवाणी, बलविंदर सिंग, नंदकुमार अडसूळ, शंकर पाटील, त्यांची पत्नी, अजित इरकल यांच्यासह आणखी नऊ जणांविरोधात भादवि कलम ३०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरेखा राम भोसले (वय ४९) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम भोसले यांनी त्यांच्या आईच्या आजारपणासाठी तसेच वैयक्तिक कारणांसाठी त्यांच्या ओळखीच्या राजेश आणि राज तावदान याच्या पत्नीकडून कर्ज काढले होते. त्या कर्जापोटी त्यांनी चार लाख रुपये त्यांना परत केलेले आहेत.

आर्थिक अडचणी आल्यामुळे भोसले यांनी पुन्हा सिद्धू मंगवानी याच्याकडून पाच लाख रुपये कर्जाने घेतले. कर्ज देण्याच्या बदल्यात कमिशन म्हणून ५० हजार रुपये देखील त्याला दिले. अन्य आरोपींनी सुद्धा भोसले यांना वेळोवेळी व्याजाने पैसे दिले आणि त्या बदल्या त्यांच्याकडून कमिशन म्हणून लाखो रुपये उकळले. त्यानंतर देखील त्यांच्याकडे वारंवार व्याजाच्या पैशाची मागणी करून घरी येऊन दमदाटी करायला सुरुवात केली. त्यांच्याकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून राम भोसले यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest