Lalit Patil Case : ललित पाटील प्रकरणात महिला पोलीस अधिकाऱ्यासह दोन जण बडतर्फ

ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) ससून रुग्णालयातून (Sassoon Hospitals) पळून गेला त्या दिवशी ड्युटीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे (Mohini Dongre) यांच्यासह सहायक फौजदार रमेश जनार्दन काळे (Ramesh Janardhan Kale) या दोघांना बडतर्फ करण्यात आले आहे.

Lalit Patil Case

ललित पाटील प्रकरणात महिला पोलीस अधिकाऱ्यासह दोन जण बडतर्फ

पुणे : ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) ससून रुग्णालयातून (Sassoon Hospitals) पळून गेला त्या दिवशी ड्युटीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे (Mohini Dongre) यांच्यासह सहायक फौजदार रमेश जनार्दन काळे (Ramesh Janardhan Kale) या दोघांना बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ही कारवाई केली. यापूर्वी पोलीस नाईक नाथाराम भारत काळे आणि अमित सुरेश जाधव या दोघांना बडतर्फ करण्यात आले होते. या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक देखील केली होती.  डोंगरे आणि काळे यांच्यावर कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाया आहे. या कारवाईमुळे पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ललित पाटील हा सध्या पुणे पोलिसांच्या अटकेत आहे. यापूर्वी या प्रकरणामध्ये त्याचा भाऊ भूषण अनिल पाटील, अभिषेक उल्हास बलकवडे (दोघेही रा. नाशिक), सुभाष जानकी मंडल (वय-२९, रा. देहूरोड, मूळ झारखंड) आणि रौफ रहिम शेख (वय-१९, रा. ताडिवाला रस्ता), जिशान शेख, प्रज्ञा अरुण कांबळे आणि अर्चना किरण निकम,  पुण्यातील रोझरी स्कूलचा संचालक विनय विवेक अर्हाना (वय ५२, रा. १४, डॉ आंबेडकर मार्ग, कॅम्प), अर्हानाचा ड्रायव्हर दत्ता डोके, अरविंद लोहारे आदी २८ जणांना आतापर्यंत  अटक झाली आहे. पोलिसांनी ललित पाटील च्या घराची झडती घेत कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त केले होते. यासोबतच त्याच्या वापरातील गाड्या देखील पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत.

दरम्यान, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ससून ड्रग्ज प्रकरणात सहायक फौजदार रमेश काळे, पोलीस अंमलदार विशाल बाबूराव टोपले, स्वप्निल चिंतामण शिंदे, दिगंबर विजय चंदनशिव यांना निलंबित केले होते. तर, ससूनमधून ललितच्या पलायन प्रकरणात सहायक निरीक्षक सविता भागवत, पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, हेड कॉन्स्टबल आदेश सिताराम शिवणकर, पोलीस नाईक नाथाराम भारत काळे, पिरप्पा दत्तू बनसोडे, अमित सुरेश जाधव यांना निलंबित करण्यात आले होते. हे दोन अधिकारी ललित पाटील पळून गेला त्या दिवशी ड्युटीवर होते. त्यांनी ललित पाटीलकडे लक्ष ठेवणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कर्तव्यामध्ये कसूर आणि हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest