दीडशे मद्यपी वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका

पुणे : धुलिवंदन आणि होळीच्या निमित्ताने वाहतूक पोलिसांनी शहरात २७ ठिकाणी नाकाबंदी करीत वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना चांगलाच दणका दिला. शहारातील विविध भागात दीडशे मद्यपी वाहनचालकांवर ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई करण्यात आली.

Pune Traffic Police News

दीडशे मद्यपी वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका

वाहतूक नियमभंग करणाऱ्या ९३३ जणांवर कारवाईचा बडगा

पुणे : धुलिवंदन आणि होळीच्या निमित्ताने वाहतूक पोलिसांनी शहरात २७ ठिकाणी नाकाबंदी करीत वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना चांगलाच दणका दिला. शहारातील विविध भागात दीडशे मद्यपी वाहनचालकांवर ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई करण्यात आली. तसेच, २२६ वाहनचालकांना ‘ट्रिपल सिट’ वाहन चालवत असतानाच पोलिसांनी पकडले. यासोबतच विरुद्ध बाजूने (राँग साईड) वाहन चालविणे, वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणे, कर्कश आवाजाचे मॉडीफाईड सायलन्सर वापरणे, सिग्नल तोडणे अशा प्रकारच्या नियमभंग करणाऱ्या तब्बल ९३३ वाहनचालकांवर कायदेशिर कारवाई करीत त्यांना दंड आकारण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली. ही मोहीम यापुढे देखील सुरू राहणार असल्याचे उपायुक्त पवार यांनी सांगितले.

शहरात होळी आणि धूलीवंदनाचा उत्साह होता. या उत्साहाच्या भरात अनुचित प्रकार घडू नये शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. स्थानिक पोलीस ठाण्यांची पथके, गुन्हे शाखेची पथके आणि वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी जागोजाग तैनात करण्यात आले होते. उत्सवानिमित्त शहरात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष केंद्रित केले होते. त्या अनुषंगाने शहरातील मध्यवस्तीसह प्रमुख रस्ते, उपनगरांमध्ये देखील एकूण २७ ठिकाणी नाकाबंदी करीत वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई केली जात होती. वाहन चालकांची कसून तपासणी केली जात होती.  मद्य पिऊन गाडी चालविणाऱ्या १४२ जणांवर ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई करण्यात आली. तसेच, विविध प्रकारच्या वाहतूक नियमभंग करणाऱ्या व्यक्तींना देखील दंड आकारण्यात आला आहे. येत्या काळात शहरात सर्वत्र वाहतूक सुरक्षेच्या अनुषंगाने ही मोहीम राबवली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, वाहतूक विभागाचे उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच, स्थानिक पोलीस ठाण्यांची पथकांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest