Pune Crime News : व्यावसायिकाच्या जागेचा घेतला ताबा; महापुरुषांचे फोटो लावून केली १७ लाखांची मागणी

व्यावसायिकाच्या जागेचा ताबा घेऊन हा ताबा सोडण्यासाठी १७ लाख रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्याप्रकरणी एका कथित कामगार नेत्याविरुद्ध स्वारगेट पोलीस (Swargate Police) ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News

व्यावसायिकाच्या जागेचा घेतला ताबा; महापुरुषांचे फोटो लावून केली १७ लाखांची मागणी

पुणे : व्यावसायिकाच्या जागेचा ताबा घेऊन हा ताबा सोडण्यासाठी १७ लाख रुपयांची खंडणी (Extortion)  मागितल्याप्रकरणी एका कथित कामगार नेत्याविरुद्ध स्वारगेट पोलीस (Swargate Police) ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपींनी या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले आदी महापुरुषांचे फोटो लावून पिवळे झेंडे लावले होते.  हे फोटो इथून काढल्यास महापुरुषांची विटंबना केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील दिली होती. हा प्रकार ८ ऑक्टोबर २०२३ रोजी महर्षीनगर येथील सर्वे नंबर ५३/४१२ या ठिकाणी घडला. (Pune Crime News) 

त्रिवेणी इंगोले आणि नामदेव घोरपडे आणि त्याचे पाच ते सहा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी सेजल रोनक शहा (वय ३७, रा. कल्पतरू सोसायटी, शंकरशेठ रोड, गुलटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव घोरपडे हा बहूउद्देशीय कामगार संघटना नावाची संस्था चालवतो. फिर्यादी सेजल शहा यांच्या वडिलांचा कागद छपाईचा व्यवसाय आहे. 

या व्यवसायासाठी लागणारा माल ठेवण्याकरता महर्षी नगर येथे असलेल्या सर्वे नंबर ५३/४१२ या ठिकाणी त्यांनी गोडाऊन केलेले आहे. या गोडाऊनच्या जागेवरून शहा आणि आरोपी यांच्यात वाद सुरू आहेत. इंगोले यांच्या वडिलांनी शहा यांना २००४ साली जागेची विक्री केली होती. त्रिवेणी इंगोले या शहा यांच्याकडे आता आणखी पैशाची मागणी करीत होत्या. त्याकरिता इंगोले यांनी घोरपडेच्या मदतीने शहा यांच्या गोडाऊनचे लोखंडी शटरचे लॉक तोडले. परवानगी न घेताच त्याचा ताबा घेतला आणि हा ताबा सोडण्यासाठी त्यांच्याकडे १७ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर या ठिकाणी महापुरुषांचे फोटो लावले आणि झेंडे देखील लावण्यात आले. हे फोटो काढल्यास तुमच्याविरुद्ध विटंबना केल्याचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. पैसे न मिळाल्यास शहा आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पुढील तपास सहायक निरीक्षक उमेश कारके करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest