Pune Bopdev Ghat Gang Rape : पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

पुण्यातील बोपदेव घाट येथे सामुहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेतील तीनही आरोपी पुणे पोलिसांना सापडले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

Pune Bopdev Ghat Gang Rape

Pune Bopdev Ghat Gang Rape : पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुण्यातील बोपदेव घाट येथे सामुहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेतील तीनही आरोपी पुणे पोलिसांना सापडले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. तीन आरोपींपैकी एकाला जिल्ह्यातून तर दोघांना नागपूर येथून ताब्यात घेतले आहे. चार ऑक्टोबर रोजी कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या बोपदेव घाटात हा सामूहिक अत्याचार घडला होता. (Pune Bopdev Ghat Gang Rape)

या घटनेनंतर शहरासह राज्यभरात अनेक आंदोलने झाली. स्वतः शरद पवार यांनी देखील या घटनास्थळी जावून पाहणी केली होती. आठ दिवस उलटून गेले तरी देखील आरोपींचा तपास न लागल्याने पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आरोपींना ताब्यात घेतले ही माहिती जरी सूत्रांकडून मिळाली असेल तरी सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी मात्र ही अफवा असून तपासाविषयी तसेच आरोपींविषयी खात्रीलायक माहिती नंतर कळविण्यात येईल असे  सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest