Theft News : दूध डेअरीमध्ये चार लाखांची चोरी

दूध डेअरीचे शटर उचकटून चोरट्याने ४ लाख ५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना कोंढवा येथील गोकुळ नगरच्या गल्ली क्रमांक तीनमध्ये असलेल्या शिवदत्त डेअरी फार्ममध्ये घडली.

Theft  News : दूध डेअरीमध्ये चार लाखांची चोरी

संग्रहित छायाचित्र

पुणे : दूध डेअरीचे शटर उचकटून चोरट्याने ४ लाख ५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना कोंढवा येथील गोकुळ नगरच्या गल्ली क्रमांक तीनमध्ये असलेल्या शिवदत्त डेअरी फार्ममध्ये घडली.

याप्रकरणी सदाशिव येडबा वाघमारे (वय ५७, रा. गजरवाडी, केदारेश्वर पार्क, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी रात्री काम संपल्यावर डेअरीला कुलूप लावून वाघमारे आणि त्यांचे सहकारी घरी गेले होते. रात्री साधारण सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास शिवदत्त डेअरीचे कुलूप आणि शटर तोडण्यात आले. चोरट्याने डेअरीमध्ये प्रवेश करून गल्ल्यामधील रोकड लंपास केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest