Hotel Shauryawada : हॉटेल शौर्यवाडा मध्ये चोरी

हांडेवाडी रस्त्यावर असलेल्या हॉटेल शौर्य वाडा (Hotel Shauryawada) या हॉटेलच्या शटरचे लॉक तोडून सव्वा लाख रुपयांची चोरी करण्यात आली. ही घटना रविवारी मध्यरात्री साडेबारा ते सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस (Loni Kalbhor Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (

Hotel Shauryawada

हॉटेल शौर्यवाडा मध्ये चोरी

पुणे : हांडेवाडी रस्त्यावर असलेल्या हॉटेल शौर्य वाडा (Hotel Shauryawada) या हॉटेलच्या शटरचे लॉक तोडून सव्वा लाख रुपयांची चोरी करण्यात आली. ही घटना रविवारी मध्यरात्री साडेबारा ते सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस (Loni Kalbhor Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News) 

राजेंद्र बाबू पेटकर (वय ४६, रा. पाटील प्लाझा बिल्डिंग, भेकराईनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पेठकर यांचे हांडेवाडी येथे हॉटेल शौर्यवाडा नावाचे हॉटेल आहे. हॉटेलच्या पाठीमागील बाजूला असलेले शटरचे लॉक चोरट्यांनी तोडले. हॉटेलमध्ये प्रवेश करून काउंटरमध्ये ठेवलेली रोकड आणि आठ टॅब असा एकूण एक लाख १३ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेण्यात आला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest