Pune Crime : औंध येथील वाईन शॉपमध्ये चोरी

औंध येथील ब्रेमेन चौकातील गोल्डन वाईन्स या दुकानाचे शटर तोडून ३५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस (Chatushringi Police) ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime

औंध येथील वाईन शॉपमध्ये चोरी

पुणे : औंध येथील ब्रेमेन चौकातील गोल्डन वाईन्स या दुकानाचे शटर तोडून ३५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस (Chatushringi Police) ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० नोव्हेंबर २०२३  ते ११ नोव्हेंबर २०२३ या कालावधी दरम्यान घडली. (Pune Crime)

याप्रकरणी विजय शंकरलाल लालवाणी (Vijay Lalvani)(वय ४९, रा. सिंध सोसायटी, औंध) यांनी फिर्याद दिली आहे. लालवाणी यांचे ब्रेमेन चौकामध्ये गोल्डन वाईन्स नावाने दुकान आहे. १० नोव्हेंबर रोजी ते दुकानाला कुलूप लावून घरी गेले होते. रात्री साडेदहा नंतर आलेल्या चोरट्यांनी या दुकानाचे कुलूप आणि शटर अर्धवट तोडले. दुकानात प्रवेश करून ड्रॉवरमध्ये ठेवलेली रोकड, पेन ड्राईव्ह आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा मुद्देमाल चोरून नेला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest