रिक्षा चालकासोबत दारू पिण्याचा मोह बेतला जीवावर

मैत्रिणी सोबत झालेल्या भांडणामध्ये हाताला काच लागून जखमी झालेल्या तरुणाला रस्त्यावरून जात असलेल्या रिक्षाचालकासोबत दारू पिण्याचा मोह आवरला नाही. रिक्षा चालकासोबत दारू पीत असतानाच दोघाजणांनी या तरुणावर धारदार हत्यारांनी वार करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना आंबेगाव पठार येथील प्यासा बा हॉटेल समोर घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 8 Sep 2023
  • 10:52 am
Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

 पुणे : मैत्रिणी सोबत झालेल्या भांडणामध्ये हाताला काच लागून जखमी झालेल्या तरुणाला रस्त्यावरून जात असलेल्या रिक्षाचालकासोबत दारू पिण्याचा मोह आवरला नाही. रिक्षा चालकासोबत दारू पीत असतानाच दोघाजणांनी या तरुणावर धारदार हत्यारांनी वार करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना आंबेगाव पठार येथील प्यासा बा हॉटेल समोर घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उल्हास सावंत (रा. करंदी बुद्रुक, ता. भोर) या रिक्षा चालकासह त्याच्या दाजी विरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विक्रम सुरेश पोकळे (वय ३७, रा. धायरी ग्रामपंचायत शेजारी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम पोकळे याचे त्याच्या मैत्रिणीसोबत भांडण झाले होते. या भांडणामध्ये त्याच्या हाताला काच लागली. त्यानंतर तो मैत्रिणीच्या घरातून बाहेर पडला आणि रस्त्याने चालत जात होता. त्यावेळी रिक्षामधून आलेल्या उल्हास सावंत आणि त्याच्या दाजीने 'तुमच्या हाताला लागले आहे, तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो' असे म्हणत रिक्षामध्ये बसवले.

त्यानंतर ही रिक्षा प्यासा बार येथे थांबवली. दारू घेऊन येतो असे त्यांनी सांगितले. त्यावेळी पोकळे यांनी मलाही दारू प्यायची आहे असे म्हणत त्यांनी देखील प्यासाभारमधून दारू घेतली. हे तिघे तिथेच रिक्षामध्ये बसून दारू पीत होते. त्यावेळी आरोपी सावंत आणि त्याच्यासोबत असलेला त्याचा दाजी या दोघांनी शिक्षामधून खाली उतरून काही कारण नसताना लोखंडी हत्यार काढले. काही कळायच्या आताच पोकळे यांच्या डोक्यात व हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest