बेकायदा पिस्तूलाचा नाद वाईट; चुकून झाडल्या गेलेली गोळी घुसली मानेत अन्...

बेकायदेशीररित्या खरेदी केलेले पिस्तूल हाताळत असताना त्यामधून चुकून झाडल्या गेलेल्या गोळीमुळे एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर दीनानाथ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हवेली तालुक्यातील सांगरून या गावातील गणपती मंदिरामध्ये घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 9 Sep 2023
  • 02:39 pm
illegal pistol

चुकून झाडल्या गेलेली गोळी घुसली मानेत

पुणे : बेकायदेशीररित्या खरेदी केलेले पिस्तूल हाताळत असताना त्यामधून चुकून झाडल्या गेलेल्या गोळीमुळे एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर दीनानाथ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हवेली तालुक्यातील सांगरून या गावातील गणपती मंदिरामध्ये घडली. याप्रकरणी उत्तम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभय छबन वाईकर (वय २२), अविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे (वय १९, दोघेही रा. सांगरून, ता. हवेली) अशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मोन्या धनवडे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार आनंद रोहिदास घोलप यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाईकर आणि मोन्या हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत आणि ते एकाच गावात राहण्यास आहेत. वाईकर याने दहशत माजविण्यासाठी बेकायदेशीरता एक पिस्तूल खरेदी केलेले होते. हे पिस्तूल त्याने मोन्या याच्याकडे हाताळण्याकरता दिले होते. मोन्या याने ते बेदरकारपणे व हलगर्जीपणाने हाताळल्याने त्यामधून अचानक गोळी झाडली गेली. ही गोळी अभयच्या मानेला लागली आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला दीनानाथ रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे सांगरून गावात खळबळ उडाली आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार या करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest