Yerwada Jail : कारागृहातून पळालेला कैदी झाला हजर आईच्या काळजीपोटी केले होते पलायन

येरवडा (Yerwada Jail) येथील खुल्या कारागृहामधून पळून गेलेल्या कैदी क्रमांक सी-९४९ आशिष भरत जाधव याला ताब्यात घेण्यात आले आहे. आईला हृदय विकाराचा झटका आल्याने तो काळजीपोटी घरी पळून गेला होता.

Yerwada Jail

कारागृहातून पळालेला कैदी झाला हजर आईच्या काळजीपोटी केले होते पलायन

पुणे : येरवडा (Yerwada Jail) येथील खुल्या कारागृहामधून पळून गेलेल्या कैदी क्रमांक सी-९४९  आशिष भरत जाधव याला ताब्यात घेण्यात आले आहे. आईला हृदय विकाराचा झटका आल्याने तो काळजीपोटी घरी पळून गेला होता. दरम्यान, त्याच्या आईवडिलांनी त्याला पोलिसांसमोर हजर केले. त्याला येरवडा पोलिसानी (Yerwada Police) ताब्यात घेतले आहे. 

जाधव रविवारी खुल्या कारागृहमधून पसार झाला होता. याबाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. कलम 224 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा शोध घेब्यास सुरुवात करण्यात आली होती. पोलिसानी आणि कारागृह प्रशासनाने त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्याच्या आईस हृदयविकाराचा झटका आल्याचे पोलिसांना समजले. यावरुन जाधव याने त्याच्या आईच्या काळजीपोटी कारागृहातुन पलायन केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. 

बुधवारी सकाळी साडेसात वाजता त्याचे आई-वडील त्याला घेऊन स्वतः कारागृहात हजर करण्यासाठी आले.  त्यावेळी कारागृहाबाहेरील प्रतिक्षालयामध्ये बंदी व त्यांचे नातेवाईकांना थांबविण्यात आले. नियमानुसार त्याला ताब्यात घेण्यासाठी तात्काळ येरवडा पोलीस स्टेशन येथे माहिती कळविण्यात आली. 

येरवडा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांनी त्याला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक दृष्टया बंद्यास आईची काळजी वाटली व त्यातूनच पलायन केल्याचे समोर आले आहे. आईचे कुशलक्षेम बघून बंदी स्वतः हुन कारागृहात दाखल झाला आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृह व येरवडा खुले जिल्हा कारागृह हया वेगवेगळया शासकीय संस्था आहेत. बंद्याने येरवडा खुले जिल्हा कारागृह येथुन पलायन केले होते. येरवडा मध्यवर्ती कारागृह येथुन नाही असे कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest