Pune Acid Threat : धक्कादायक ! पुण्यात तरुणीला दिली ऍसिड फेकण्याची धमकी

पुणे : एकाच महाविद्यालयात शिकत असलेल्या मित्र-मैत्रिणींना झालेल्या वादामधून तरुणीवर ॲसिड (Acid) फेकून तिला मारण्याची धमकी (threat) देण्यात आली. हा धक्कादायक प्रकार पाषाण येथील संजय गांधी वसाहती जवळील रस्त्यावर घडला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 20 Oct 2023
  • 09:55 am
Acid threat

संग्रहित छायाचित्र

पुणे : एकाच महाविद्यालयात शिकत (Pune) असलेल्या मित्र-मैत्रिणींना झालेल्या वादामधून तरुणीवर ॲसिड (Acid) फेकून तिला मारण्याची धमकी (threat) देण्यात आली. हा धक्कादायक प्रकार पाषाण येथील संजय गांधी वसाहती जवळील रस्त्यावर घडला. याप्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी (Chatushringi Police) विनयभंग (molestation)आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

शिखा केदिया (वय १९, रा. बावधन) आणि मल्हार भोसले (वय १९, रा. औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी १९ वर्षीय तरुणीने फिर्यादी दिली आहे. ही तरुणी बालेवाडी येथे राहण्यास आहे. आरोपी शिखा आणि मल्हार तसेच फिर्यादी तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ते एकाच महाविद्यालयात शिकतात शिकतात. शिखा हिने फिर्यादी तरुणीला फोन केला आणि तिला शिवीगाळ करीत दमदाटी केली. तर, मल्हार याने पीडित तरुणीला अश्लील भाषेत शिवीगाळ करीत  तिचा विनय बंद केला.  घाणेरडे शब्द बोलून फिर्यादीवर ऍसिड फेकण्याची धमकी दिली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest