टोळक्याने पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले; फुरसुंगीतील घटना

फुरसुंगी येथील घटना पुणे मोटर सायकलवरून जात असलेल्या तरुणाला कार आणि दुचाकीवरून आलेल्या जवळपास दहा ते बारा जणांनी घडवीत पिस्तुलाचा धाक दाखवीत मारहाण करीत लूटमार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 9 Sep 2023
  • 12:33 pm
Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : फुरसुंगी येथील घटना पुणे मोटर सायकलवरून जात असलेल्या तरुणाला कार आणि दुचाकीवरून आलेल्या जवळपास दहा ते बारा जणांनी घडवीत पिस्तुलाचा धाक दाखवीत मारहाण करीत लूटमार केल्याची घटना उघडकीस आली आहे. फुरसुंगी येथील चंदवाडी कॅनॉल रस्त्यावर गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हडपसर पोलिसांनी अज्ञात आरोपीत विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 याप्रकरणी साईनाथ अंकुश शेडगे (वय २५, रा. छोटी वडार वस्ती, कर्वेनगर) यांनी फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेडगे हे रिक्षाचालक असून त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे. त्यांच्या मोटरसायकलवरून ते घराकडे जात होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून पाच ते सहा जण आले. त्यासोबतच दोन मोटरसायकल वरून सहा जण आले. या सर्वांनी शेडगे यांना अडवले. पिस्तुलाचा धाक दाखवीत मारहाण करून त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यांच्या पॅन्टच्या खिशातील पाकीट काढून त्यामधून साडेपाच हजार रुपयांची रोकड काढून घेतली. तसेच, पॅन कार्ड आणि आधार कार्डची प्रत जबरदस्ती चोरी करून नेली. यावेळी आरोपींनी 'अगर किसी को कुछ बताया, या पुलीस मे कंप्लेंट किया, तो तुझे खतम करेंगे' अशी धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest