Pune News : अतिक्रमण निरीक्षकाला केली शिवीगाळ

अतिक्रमण कारवाई (Encroachment action) करण्यासाठी गेलेल्या पुणे महानगरपालिकेच्या (PMC) पथकाला अडथळा निर्माण करून त्यांना बघून घेण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला.

Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : अतिक्रमण कारवाई (Encroachment action) करण्यासाठी गेलेल्या पुणे महानगरपालिकेच्या (PMC) पथकाला अडथळा निर्माण करून त्यांना बघून घेण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune News)

रेखा लक्ष्मण दहिभाते (Rekha Laxman Dahibate) (रा. गांधीनगर, नवश्या मारुती मंदिर समोर) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी प्रथमेश दिलीप पाटील (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील हे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आहेत. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय त्यांची नेमणूक आहे. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी घेऊन पाटील या ठिकाणी असलेल्या बेकायदा पथारी व्यवसायिकांवर कारवाई करण्यासाठी गेलेले होते. त्यांनी बेकायदा पथारी काढून घेण्याच्या सूचना दिल्या. परंतु, दहिभाते यांनी त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला. त्यांना शिवीगाळ करून कर्तव्य बजावण्यापासून प्रतिबंधित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest