Accident : 'गोल्फ क्लब'मधून बाहेर आलेल्या बॉलमुळे घडला अपघात

येरवडा येथील रस्त्याने जात असलेल्या दुचाकीचालक वकिलाला पूना क्लब गोल्फ क्लबमधून (golf club) बाहेर आलेला बॉल लागला आणि दुचाकी रस्त्यावर पडून अपघात घडला. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडला. दुचाकी चालकाच्या डोळ्याखाली जखम झाली आहे.

Accident

संग्रहित छायाचित्र

पुणे : येरवडा येथील रस्त्याने जात असलेल्या दुचाकीचालक वकिलाला पूना क्लब गोल्फ क्लबमधून (golf club) बाहेर आलेला बॉल लागला आणि दुचाकी रस्त्यावर पडून अपघात घडला. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडला. दुचाकी चालकाच्या डोळ्याखाली जखम झाली आहे. (Accident)

 पुना क्लब गोल्फ कोर्सचे मॅनेजमेंट, गोल्फ खेळणारा अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एड. अमोल विश्वनाथ नखाते (वय ३०, रा. आदीनाथ कॉलनी, रहाटणी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नखाते हे त्यांच्या सहकाऱ्यासह जीएसटी भवन ऑफीस समोरील विमानतळ रस्त्यावरून गोल्फ क्लबच्या कंपाउंन्डलगत असलेल्या रस्त्याने भूमी अभिलेख कार्यालयात सुनावणीसाठी जात होते. त्यावेळी अचानक गोल्फ कोर्समधून एक बॉल वेगाने बाहेर आला. हा बॉल नखाते यांच्या डोळ्याखाली लागला. जखमी झालेले नखाते दुचाकीसह खाली पडले. थोडे सावरल्यानंतर त्यांनी पाहिले असता त्यांच्याजवळ बॉल पडलेला होता. यासंदर्भात त्यांनी येरवडा पोलीस (Yerwada Police) ठाण्यात तक्रार दाखल केली.

पुना क्लब गोल्फ कोर्सच्या मॅनेजमेंटने तसेच गोल्फ खेळणा-या अनोळखी व्यक्तीने गोल्फ खेळताना मानवी जिवीतास धोका निर्माण होवू न देण्यासाठी  याची कोणतीही खबरदारी घेतली नाही. गोल्फ बॉल मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा रितीने जोरात मारला. फिर्यादी यांच्या डोळ्याच्या जवळ दुखापत होण्यास कारणीभुत झाल्याप्रकरणी पुना क्लब गोल्फ कोर्सचे मॅनेजमेंट तसेच गोल्फ खेळणारा अनोळखी व्यक्ती यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest